आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-मानसिक रुग्णांच्या सेवेला राज्यस्तरीय मान्यता; रवी बोडके यांची मानसिक आरोग्य मंडळावर निवड.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मानसिक रुग्णांच्या सेवेला राज्यस्तरीय मान्यता; रवी बोडके यांची मानसिक आरोग्य मंडळावर निवड.

वाई, दि. ११ : समाजातील अनाथ, निराधार, बेघर आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी गेली अनेक वर्षे अविरत कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांना राज्य शासनाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांची मानसिक आरोग्य मंडळ (Mental Health Review Board – MHRB) वर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १७ वर्षांपासून रवी बोडके हे वंचित आणि उपेक्षित घटकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहेत. त्यांनी वाई तालुक्यातील वेळे येथे यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून निराधार, अनाथ आणि मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तींसाठी आश्रयस्थान उभारले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय हा उपक्रम चालवत अनेक गरजूंना आधार आणि नवजीवन देण्याचे कार्य ते करत आहेत.
राज्य शासनाने फेब्रुवारी २०२६ मध्ये मानसिक आरोग्य मंडळाच्या स्थापनेस मंजुरी दिल्यानंतर अशासकीय सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासाठी गठित समितीने विविध अर्जांची छाननी आणि मुलाखती घेतल्यानंतर मानसिक रुग्णांच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून रवी बोडके यांची निवड निश्चित केली.
मानसिक आरोग्य क्षेत्रातील समस्या, रुग्णांचे हक्क आणि त्यांच्या पुनर्वसनासंबंधीच्या मुद्द्यांना शासनस्तरावर अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी ही निवड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्याला मिळालेली ही मोठी पोचपावती असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
रवी बोडके यांच्या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि स्वयंसेवी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, सातारा जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले जात आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button