ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेनेच्यावतीने फलटण शहरात डस्टबीनचे वाटप : शिवसेनेच्या संकटकाळातही शिवसेनेचे लोकोपयोगी समाजकार्य चालू.

प्रतिनिधी:- आशुतोष चव्हाण सातारा:-7378619519

*शिवसेनेच्यावतीने फलटण शहरात डस्टबीनचे वाटप : शिवसेनेच्या संकटकाळातही शिवसेनेचे लोकोपयोगी समाजकार्य चालू*

“स्वच्छ फलटण..सुंदर फलटण..आमचं फलटण..आपलं फलटण” अशा भावनेतुन फलटण तालुका शिवसेना पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन मलटण येथे 200 डस्टबीनचे वाटप केले. मागील आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवा शिवसैनिक अक्षय तावरे यांनी घरटी डस्टबीनचे वाटप करण्याची संकल्पना बोलुन दाखवली होती. त्यानुसार युवा शिवसैनिक अक्षय तावरे यांच्यावतीने मलटण शहरामध्ये 200 डस्टबीनचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले. सदर संकल्पना ही स्वच्छता व समाजहिताची असल्याने कोणतीही दिरंगाई न करता मलटणमध्ये सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत मलटणमध्ये 200 डस्टबीनचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले. यावेळी कोणतीही कसलीही समस्या असल्यास शिवसेनेकडे संपर्क साधावा असेही नम्रपुर्वक आवाहन करण्यात आले. तसेच मंगेश खंदारे, अक्षय तावरे, आशिष कापसे, अमोल सस्ते हे आमचे नव्याने प्रवेश केलेले शिवसैनिक अशाप्रकारे लोकोपयोगी कामे करुन येथील जनतेचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवतील यात काही शंका नसल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून शिवसेना, ठाकरे परिवार, शिवसैनिक व मातोश्री अतिशय मोठ्या महासंकटातुन जात असतानाही फलटण तालुका शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालुन दिलेल्या 80 टक्के समाजकारण आणि फक्त 20 राजकारण या शिवसेना पक्षाच्या मुलभूत तत्वाचा आदर्श पुन्हा एकदा फलटण शहरात दाखवुन दिला आहे. महाराष्ट्रातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी चालू परिस्थितीचा विषय डोक्यात न घेता आपण नेहमीच करत असलेली समाजोपयोगी कामं आताच्या परिस्थितीतही तशीच चालू ठेवावीत. शिवसेना आपोआपच एकसंध राहील व वाढतच जाईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे शिवसेना, शिवसैनिक व महाराष्ट्राला सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. आपण आपल्या समाजकारणातुन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे हात बळकट करुया असे आवाहनही शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी केले आहे.

डस्टबीनचे वाटप करत असताना शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, शहरप्रमुख रणजित कदम, प्रभारी शहर प्रमुख निखील पवार, ग्राहक संरक्षण कक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख विश्वास चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी जिल्हाप्रमुख शैलेंद्र नलवडे, शिवसेना फलटण उपतालुका प्रमुख अभिजीत कदम, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, ग्राहक संरक्षण कक्षाचे फलटण उपशहर प्रमुख भारत लोहाना, उपशहर प्रमुख राहुल पवार, ओंकार सरगर, रोहित इंगळे, अक्षय तावरे, मंगेश खंदारे, आशिष कापसे, अमोल सस्ते आदी शिवसैनिक उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button