नागपूर:-“पारंपरिक वैद्यक क्षेत्राला नवे नेतृत्व” – देवेंद्र रामचंद्र साठे यांची अखिल भारतीय पारंपरिक वनौषधी प्रशिक्षित वैद्य महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नियुक्ती.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“पारंपरिक वैद्यक क्षेत्राला नवे नेतृत्व”
देवेंद्र रामचंद्र साठे यांची अखिल भारतीय पारंपरिक वनौषधी प्रशिक्षित वैद्य महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नियुक्ती.

नागपूर | प्रतिनिधी
अखिल भारतीय पारंपरिक वनौषधी प्रशिक्षित वैद्य महासंघ यांच्या वतीने पारंपरिक वैद्य देवेंद्र रामचंद्र साठे यांची “महाराष्ट्र राज्य अध्यक्ष” या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, पारंपरिक आरोग्य सेवा, वनौषधी संवर्धन, आयुर्वेदीय जनजागृती तसेच सामाजिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्मल कुमार भृगू यांनी सांगितले की, पारंपरिक वैद्यक शास्त्र आणि ग्रामीण भागातील आरोग्य जनजागृतीसाठी श्री. साठे यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वगुणांचा फायदा महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करण्यासाठी निश्चितच होणार आहे.
तसेच महासंघाचे महासचिव तथा फाउंडर राजेंद्र डेकाटे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, पारंपरिक वनौषधी आणि आयुष उपचार पद्धती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महासंघ सातत्याने कार्यरत आहे. श्री. देवेंद्र साठे यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील संघटनात्मक जाळे अधिक मजबूत होईल आणि पारंपरिक वैद्य बांधवांना नवी दिशा मिळेल.
यावेळी राष्ट्रीय संपर्क प्रमुख वैद्य रामेश्वर माने यांनीही श्री. देवेंद्र रामचंद्र साठे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात पारंपरिक वैद्यक क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी आणि संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी श्री. साठे यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेकडून प्रदान करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, श्री. साठे यांच्यावर संघटनेच्या कार्याचा विस्तार, पारंपरिक वैद्यक अभियानाची जनजागृती तसेच सामाजिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारतीय संविधानाचा सन्मान राखून संघटनेच्या नियम व तत्त्वांचे पालन करत कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
या निवडीबद्दल राज्यभरातील पारंपरिक वैद्य, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री. देवेंद्र रामचंद्र साठे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पारंपरिक वैद्यक आणि वनौषधी उपचार पद्धतीला समाजमान्यता मिळवून देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
— अखिल भारतीय पारंपरिक वनौषधी प्रशिक्षित वैद्य महासंघ, नागपूर




