आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-आय.पी.एस.निखील पिंगळे यांची सातारा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-आय.पी.एस.निखील पिंगळे यांची सातारा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती.

सातारा, दि. २०

सातारा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचा उपयोग राजकीय दृष्ट्या केल्याचा आरोप असलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयपीएस निखील पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा परिषद निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर भाजप व सातारा पोलीस युतीबाबत उघडपणाने नाराजी व्यक्त केली जात होती. साताऱ्यातील पोलीस यंत्रणा चर्चेत आली होती.

अपहरणाचा गुन्हा व जिल्हा परिषद सदस्यांना धक्काबुक्की, अटक आणि मतदान प्रक्रियेतील हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे हा मुद्दा उन्हाळी हंगामातील महाराष्ट्र विधानमंडळातही गाजला. आदरणीय श्री दोशी यांच्या निलंबनाची मागणी, त्यानंतरचे आदेश आणि त्यावरून निर्माण झालेले वाद यामुळे प्रशासनावर लक्ष केंद्रीत झाले होते. या पार्श्वभूमीवर श्री दोशी काही दिवस अर्जित रजेवरही होते. परंतु या संदर्भातील पोलीस अधिकारी श्री म्हेत्रे व गर्जे यांच्यावरील कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याबाबतही शिवसेना उपनेते व सातारा जिल्हा पालकमंत्री आक्रमक होणार आहेत असे समजते.
सातारा जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना विविध जिल्ह्यांतील कामाचा अनुभव आहे. त्यांनी पंढरपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथे राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक, तसेच लातूर आणि गोंदिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील असून प्रशासकीय अनुभवामुळे त्यांच्याकडून साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

साताऱ्यातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्री पिंगळे यांच्यासमोर सातारा जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, गुन्हेगारांचे उद्दातीकरण व परप्रांतीय वाढत्या नागरीकरण आणि कायदा व सुव्यवस्था अशा अनेक प्रश्नांच्या बाबत काही दिवसांसाठी त्यांना अभ्यास करावा लागणार आहे. कारण बऱ्याच गोष्टी या विलंबाने उघड होत असल्याने गुन्हेगार सुटत आहे अशी चर्चा होत आहे.

2) साताऱ्यात सेनानेते व उपमुख्यमंत्र्यांनी हात जोडण्याचा बॅनर काढला…

(अजित जगताप).

सातारा दि: सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्याचे शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी सातारा दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त सातारा शहरात बॅनरबाजी लावताना उपमुख्यमंत्री शिंदे हे पालकमंत्री देसाई यांना हात जोडल्याचा सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॅनर लावण्यात आला होता. परंतु, हा बॅनर तातडीने काढल्यामुळे तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा दौऱ्यावर येतात. त्यावेळेला शिवसैनिक कमी पण पोलीस व अधिकारी जास्त त्याहीपेक्षा बॅनर जास्त असतात अशी नेहमीच चर्चा होते. सध्या मोठ्या प्रमाणात सातारा शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी सातारा नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता बॅनरबाजी केलेली आहे. बरोबर महिन्याभरापूर्वी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यामुळे सातारा महाराष्ट्रभर गाजला होता. त्यानंतर बरोबर एक महिन्याने आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या या फुकटच्या बॅनरबाजीने सातारा नगरपालिकेचा कर बुडला आहे. परंतु, बुडत्याचा पाय खोलात असल्यामुळे याबाबत कारवाई होत नाही. याचाही अनेकदा अनुभव सातारकर कडक उन्हाळ्यात घेत आहेत. त्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. सध्या प्रश्न बॅनरचा कर भरला की नाही? हा नसून बॅनरबाजी वरील फोटोच्या पोझिशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर वीस जागा निवडून दाखवले आहेत. महायुतीतील राष्ट्रवादीला सोबत घेऊन राष्ट्रवादीने १५ जागा जिंकल्या आणि काँग्रेस व शेतकरी संघटना अशा दोन जिल्हा परिषद सदस्यांनी सदस्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी युतीला पाठिंबा दिला होता. तरीही भाजपने शासकीय यंत्रणा व पोलिसांच्या मदतीने सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता बळकवली होती. ग्रामीण भाषेत जावळीचे काही मतदार सांगतात की, सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचा भाजपने अपहरण केले आहे. त्यांना जनतेला जाब द्यावा लागेल. एकट्या पालकमंत्री देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली होती पण शिवसेना पदाधिकारी यांनी मौन धारण केले होते. अशी सुद्धा टीका झाली आहे. याबाबत सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे साताऱ्यातील गांधी मैदानावर काय बोलणार ?याकडे लक्ष लागले आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना नेते व उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना हात जोडल्याच्या बॅनरबाजी मुळे असा बॅनर का लावला? भाजपला रोखून धरण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई आक्रमक झाले म्हणून ही पोझिशन बॅनर मधून दिसली की, महायुतीत राहून भाजपच्या विरोधात रान उठवले म्हणून हात जोडले का? अशी आता चर्चा रंगू लागलेली आहे. सदर बॅनरबाजीमुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतल्यामुळे अखेर हा बॅनर उतरवण्यात आला. घाई गडबडीने व स्वतःची छबी दिसण्यासाठी केलेला प्रताप हा अंगलट आल्याचे बोलले जात आहे. शेवटी सर्वांनाच व्यक्ती स्वतंत्र आहे. व्यक्ती स्वतंत्र म्हणजे स्वराचार नाही. काही बंधने पाळली जातात. याचा आता भान न राखल्यास त्याचा शिवसेनेला फटका बसू शकतो. सध्या सातारा शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा नाट्य हे कशामुळे घडले आहे? याची सुद्धा बातमी आता लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यापूर्वीच या बॅनरने बुंद से गयी व हौद से नही आती.. याची प्रचिती आलेली आहे. दरम्यान याबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची सत्य भूमिका समजू शकली नाही.

3) सातारा:-पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयाची यशाची परंपरा कायम.

पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय सातारा विद्यालयाचा इयत्ता दहावी सीबीएसई बोर्ड चा निकाल घोषित झाला असून या निकालाची प्रतिवर्षाप्रमाणे यशाची परंपरा कायम ठेवण्याची भूमिका विद्यार्थी व शिक्षकांनी पार पाडली आहे. अथक परिश्रम व सततचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल देण्याचे सत्र कायम ठेवले आहे. कु.वैष्णवी किशोर जाधव व जीवन सरकाळे यांनी प्रत्येकी 97.20 टक्के गुण प्राप्त करत प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला आहे. कु. अनुष्का विक्रम ढोले 97 टक्के गुण मिळवून दुसरी आली आहे. तर कु. संचिता समाधान भोईटे ही 96.20 टक्के गुण प्राप्त करून तिसऱ्या स्थानावर आहे. मराठी विषयात 80 पैकी 40 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 मार्क तसेच सामाजिक शास्त्र विषयात जीवन सरकाळे विद्यार्थ्याने 100 पैकी 100 मार्क प्राप्त करण्याचा विक्रम गाठला आहे. मराठी विषयाचे शिक्षक श्री सचिन कळनार यांच्यावर ही जिल्ह्यातून तसेच नवोदय विद्यालय समितीच्या अधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सर्वच विषयात उच्चांक ठेवण्याचा प्रताप ही विद्यार्थ्यांच्या नावे बहाल झाला आहे. विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्राचार्या, उपप्राचार्य व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. माननीय कलेक्टर महोदय, शिक्षणाधिकारी तसेच विद्यालय मॅनेजमेंट कमिटीच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. पालक शिक्षक संघाच्या वतीने ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

4) सातारा:-उपेक्षित समाजासाठी दलित महासंघाचे कार्य उल्लेखनीय : डॉ.राहुल जाधव.

प्रतिनिधी/सातारा दि: सातारा जिल्ह्यात कष्टकरी, शेतमजूर, उपेक्षित, वंचित, दलित, शोषित घटकांसाठी काम करणारी दलित महासंघासारखी संस्था त्यांना त्यांचे हक्क मिळवून देत आहेत. त्यांच्या हितासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव यांनी काढले.
दलित महासंघ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीच्यावतीने आयोजित प्रबोधन मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम, भुलतज्ञ डॉ. रामचंद्र जाधव, नेत्ररोगतज्ञ डॉ. चंद्रकांत काटकर, बालरोगतज्ञ डॉ. उल्का झेंडे, स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुधीर कदम, दंतचिकित्सक डॉ. सुजय सकट, डॉ. अनुराधा सकट तसेच जिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक श्रीनिवास जोशी यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, विशाल कदम, अनिल वीर, गुरुनाथ जाधव, संजय कारंडे, विश्वास शेंडगे, रामदास पवार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणीसाठी योगदान देणारे किशोर गालफडे यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, दलित महासंघ ही केवळ एका समाजापुरती मर्यादित संघटना नसून सर्व समाजातील उपेक्षित व वंचित घटकांसाठी न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे. पत्रकारांनी अपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील तरुण नेतृत्व करू शकतो. काही वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होऊ अथवा न हो यापेक्षा कार्य करणे महत्त्वाचे असे आम्ही आजही मानतो. असे त्यांनी स्पष्ट केले.
किशोर गालफाडे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २०२३ पासून पाठपुरावा सुरू असून त्यास यश आले आहे. जागतिक कामगार दिन १ मे नंतर राज्याचे बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे भोसले यांची वेळ मिळाल्यानंतर लवकरच स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे स्वागत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत साठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनिषा चव्हाण, मंगेश चव्हाण, पूजा घाडगे, विमल शिंदे, मीना अडागळे, सविता कणसे, आशिकी गुंजाळ, रिना भोसले, अरुणा भोसले, रुपिता पवार, मनिषा माने, सुभाष गुंजाळ, वैभव गवळी, महेंद्र वायदंडे, सचिन मोरे आदींनी परिश्रम घेतले. या विशेष कार्यक्रमाला ॲड विलास वहागावकर, अमोल पाटोळे, डॉ अशोक भिसे व विविध समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या सन्मान केल्याबद्दल पत्रकारांनी ही डिलीट महासंघाचे आभार मानले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button