सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ, क्रीडा सभापती यांचा पदग्रहण सोहळा.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ, क्रीडा सभापती यांचा पदग्रहण सोहळा.

तालुका प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा:- नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये नूतन निवडून आलेले सौ. तेजस्विनी ताई विक्रमसिंह कदम यांची सातारा जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ, क्रीडा समिती च्या सभापतीपदी निवड करण्यात आली या निवडीमुळे खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतील हक्काचे सभापती म्हणून पहिले जाणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातून निवडून आलेल्या व्यक्तीला प्रथमच सभापती पद मिळाल्याने सभापती या पदावर विराज मान होताना त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना गुरुवर्य भारतीय जनता पार्टीचे माझी जिल्हा अध्यक्ष, वर्धन ऍग्रोचे संस्थापक चेअरमन मा. श्री धैर्यशील दादा कदम, संचालक श्री. अविनाश हिंदुराव साळुंखे, नवनिर्वाचित पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्री. संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील, पाडळी गावचे सुपुत्र युवा नेतृत्व लखन ढाणे, गणेशवाडी गावचे युवा नेतृत्व समीर साळुंखे यांनी पुष्पगुच्छ देऊन तेजस्विनी ताई यांचा सत्कार करण्यात आला




