सातारा:-आरोग्य आणि क्रीडा विकासासाठी पंचायत समिती सदस्याची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-आरोग्य आणि क्रीडा विकासासाठी पंचायत समिती सदस्याची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा.

तालुका प्रतिनिधी महेश मोहिते
सातारा:- नागठाणे गावातील व गणातील युवक व युवतींच्या आरोग्य संवर्धनाच्या उद्देशाने पंचायत समिती सदस्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.नितीन तारळकर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान गावातील तरुणांसाठी विविध क्रीडा उपक्रम, व्यायाम सुविधा तसेच आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पंचायत समिती सदस्यांनी युवक-युवतींना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी क्रीडा साधनसामग्री उपलब्ध करून देणे, तसेच नियमित क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची मागणी यावेळी मांडली. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनीही या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे गावातील युवक-युवतींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढून क्रीडा प्रेमाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.




