कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-शेनवडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अरुण दादा दबडे यांची निवड.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शेनवडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अरुण दादा दबडे यांची निवड.

मायणी प्रतिनिधी-
शेनवडी येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी श्री.अरुणदादा दबडे यांची निवड झाल्याबद्दल वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. विक्रमबाबा कदम यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच पुढील कार्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मुंबई मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री.एल.एम.महाडिक, युवा नेते श्री.बाळूआप्पा थोरात, अमित जाधव, माजी उपसरपंच बबन माळी, चंद्रकांत महाडिक, रवींद्र घोडके, युवा नेते श्री.सागर जाधव, रवींद्र घोडके भोसले, श्री.सुतार गुरुजी, श्री. शंकर घोडके यांच्यासह शेनवडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




