महाबळेश्वर तळदेव मध्ये महाशिवरात्रीचा दिव्य सोहळा; कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून शिवभक्तीचा जागर.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महाबळेश्वर तळदेव मध्ये महाशिवरात्रीचा दिव्य सोहळा; कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून शिवभक्तीचा जागर.

महाबळेश्वर प्रतिनिधी उत्तम भालेराव
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे पवित्र महाशिवरात्री निमित्त अत्यंत मंगलमय व भक्तिमय वातावरणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नेहरू एकता मंडळ तळदेव व तळेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर शिवमय करून टाकला.
तळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली, नेहरू युवा मंडळ तळदेवचे अध्यक्ष निलेश जंगम, ट्रस्टचे उपाध्यक्ष नारायण जंगम, सचिव विकास जंगम तसेच सर्व सभासद व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचला.
या आयोजनात मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सभासद, ग्रामस्थ, युवक वर्ग, महिला वर्ग यांनी खांद्याला खांदा लावून जबाबदाऱ्या पार पाडल्या. नियोजन, सजावट, धार्मिक विधी, भजन-कीर्तन, महाप्रसाद व्यवस्था ते भाविकांच्या स्वागतापर्यंत प्रत्येक घटकात कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध व समर्पित भूमिका दिसून आली.
कोयना-सोळशी कांदा टी विभागातील सर्व भाविकांना सप्रेम आमंत्रित करून दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात हर हर महादेवच्या गजरात वातावरण दुमदुमून गेले. गावातील तरुणाईने उत्साहाने सहभाग घेतला तर महिलावर्गानेही सक्रिय उपस्थिती दर्शवत कार्यक्रम अधिक मंगलमय केला.
एकी, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम घडवत तळदेवने पुन्हा एकदा धार्मिक व सामाजिक ऐक्याचा आदर्श घालून दिला. शिवभक्तांच्या या अखंड निष्ठेमुळे तळदेव नगरीत साक्षात भोलेनाथांचा आशीर्वाद लाभल्याची भावना सर्वांच्या मनात दाटून आली.




