ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह ! १३० एकरात उसळणार भक्तीचा महासागर.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

 श्रीरामपूर:-गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह ! १३० एकरात उसळणार भक्तीचा महासागर.

श्रीरामपुर / माळेवाडी ( RPS स्टार न्युज प्रतिनिधी ) श्री क्षेत्र सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र धनगरवाडी दिघी ( रांजणगाव खोर्डे ) शिवारातील मध्यवर्ती परिसरामध्ये वैकुंठवासी सद्गुरु योगीराज श्री गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा १८ ते २५ ऑगस्ट दरम्यान तब्बल १३० एकरांच्या अथांग परिसरामध्ये पार पडणार आहे ज्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे . शतकानुशतके चालत आलेली . ही महान अध्यात्मिक परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना विलोभनीय भक्तीचा अनुभव येण्यासाठी हा भव्य उत्सव आयोजित केला जातो या सप्ताहात १५ हजार टाळकरी १६८ तासांचे अखंड भजन करणारा असून भाविकांसाठी ४ एकरांचे भोजन पंडाल कृषी प्रदर्शन आणि १४ हजार स्वयंसेवकांचे चोख नियोजन करण्यात आले आहे २५ ऑगस्ट ला काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होईल अध्यात्म आणि प्रबोधनाचा जागर करत भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पंचक्रोशीतील गावे या सोहळ्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button