ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-घराणे शाही बळकट करण्यासाठी पाळीव प्राण्यांनाही निवडणुकीत सहभागी करावे- पंजाबराव पाटील

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) घराणे शाही बळकट करण्यासाठी पाळीव प्राण्यांनाही निवडणुकीत सहभागी करावे- पंजाबराव पाटील

सातारा दि: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाही व कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचा सपाटा राजकीय पक्षांनी लावलेला आहे. काही वेळेला त्याच घरातील पाळीव प्राण्यांना निवडणुकीत सहभागी केले तर वावगे ठरणार नाही. अशी उपरोधात्मक मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रस्थापित काही घराणेशाहीतील व्यक्तींना राजकीय पक्ष संधी देतो. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळत नाही. तशीच अवस्था प्रस्थापित राजकीय घराण्यातील मांजर, गाढव, बैल , गाई व कोंबड्या, शेळी, बोकड, मेंढी, उंट अशा लाडक्या मुक्या प्राण्यांची होत असावी. त्यांना ही उमेदवारी व मतदानाचा अधिकार मिळावा. यासाठी प्राणीशाही मार्गाने विचार व्हावा. अशी उपरोधत्कमक मागणी केल्याने राजकीय पक्षाच्या नेत्यांना आत्मचिंतन करावे लागत आहे.
सध्या प्रस्थापित नेत्यांनी सर्वच निवडणुकांमध्ये स्वतःच्या कुटुंबातील अकार्यक्षम व  कोणताही सामाजिक कार्यात गंध नाही. नेत्यांचे सेवेकरी व लबाडीच्या  पैशातून निवडणुकीची हौस भागविणाऱ्या व्यक्तींना काही ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आहे. यासाठी दरोडेखोऱ्यांना उचलू लागणारे छोट्या घराणेशाहीचे सराईत चोर सुद्धा सामील झाले आहेत. असेच चित्र दिसत आहे. या बाबत खेद करण्यापेक्षा प्राण्यांवर प्रेम करण्याचा या निमित सल्ला देण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. असे ही श्री. पाटील यांनी नमूद केले आहे.
सर्व निवडणुकीत उभे करण्याची काहींना निवडणूक लढवणे हा जन्मसिद्ध हक्क आहे असे वाटते. परंतु ,काही नेत्यांना इच्छा अ�

2) वय ५८ नि ५८ वे रक्तदान करून दीपक भुजबळ गुरुजींनी घडवला इतिहास..

सातारा दि: आदर्श गाव निढळ तालुका खटाव येथील सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री दीपक भुजबळ यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी५८ वे रक्तदान करून इतिहास घडवला आहे.
कोंडवे तालुका सातारा येथील दीपक भुजबळ गुरुजींची आई कैलासवासी सौ जयश्री शंकरराव भुजबळ यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त स्मरणार्थ हे रक्तदान केले आहे .आपल्या बुद्धी सोबतच शारीरिक क्षमतेचे ही दर्शन घडवले आहे. याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे.
शिक्षण क्षेत्राचा वारसा लाभलेल्या दिपक शंकरराव भुजबळ गुरुजी यांचे आजोबा विठ्ठल भुजबळ, वडील श्री शंकरराव भुजबळ आणि स्वतः दीपक भुजबळ यांनी सुद्धा शिक्षक म्हणून एक पिढी घडवली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारे श्री भुजबळ घराण्याची चौथी पिढी उच्च शिक्षण घेऊन सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देत आहे.
. शाहूपुरी, कोंडवे ,हामदाबाज, म्हाते खुर्द, ठोंबरेवाडी, गाढवली, बामणोली ,आणि सध्या निढळ या ठिकाणी त्यांनी 37 वर्ष सेवा बजावली. .
१९८५ साली त्यांनी पहिले रक्तदान केले. आणि नेमके ४० वर्षांनी त्यांनी ५८व्या वर्षी ५८ वे स्वतः रक्तदान केले. पत्नी सौ . कांचन दिपक भुजबळ आणि मुलगा ओमकार भुजबळ, कन्या कुमारी क्रांती भुजबळ यांनी मरणोत्तर देहदान करून आपल्या देहाचाही उपयोग समाजासाठी व्हावा. असे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून साक्षरता प्रसार, साक्षरता वारी अशा उपक्रमामध्येही ते सहभागी होत आहेत.
स्वच्छ सुंदर प्राथमिक शाळा करण्यासाठी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन शाळा स्वच्छ करण्याची मोहीम राबवली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे समजून ते प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करत आहेत. त्यांच्या या कार्याचा अनेक संस्थेने गौरव केला आहे.
गोरगरिबांच्या मुलांना मोफत लाईफ जॅकेट देऊन त्यांना पोहण्यास शिकवले. आज अनेक मुलं, मुली राष्ट्रीय खेळाडू म्हणून तसेच लष्करामध्ये सेवा बजावत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज – फुले- शाहू- आंबेडकर विचाराचा वारसा जपणाऱ्या गुरुजन श्री दीपक भुजबळ यांनी खऱ्या अर्थाने बहुजन समाजामध्ये रक्तदान व मरणोत्तर देहदान दीप ज्योत पेटवला आहे. त्यांची भावजय सौ अरुणा किरण भुजबळ या शिक्षण विभागातील एस. सी. इ. आर. टी. सहाय्यक संचालक म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत. श्री भुजबळ यांच्या या यशामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल त्यांनी कुटुंबीयांना ही धन्यवाद दिले आहेत. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button