कृषीकन्यानी केला गोरेगाव(वांगी) येथे कृषी दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी - सौरभ चव्हाण :-9503995968

*कृषीकन्यानी केला गोरेगाव(वांगी) येथे कृषी दिन उत्साहात साजरा* महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयातील चौथ्या वर्षांमधील विद्यार्थिनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी कन्या म्हणून गावांमध्ये उपस्थित झाल्या आहेत.
आज कृषी दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायत ग्रामस्थ अंगणवाडी सेविका व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष दिंडीने झाली माननीय सौ शुभांगी जाधव (सरपंच ,गोरेगाव वांगी) , माननीय श्री श्रीकांत माने (उपसरपंच) , माननीय श्रीमती शि. सु. देटके (ग्रामसेविका) , मा. श्री. धनाजी किसान चव्हाण (मुख्याध्यापक जि. प. शाळा ,गोरेगाव वांगी) यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक मा. श्री व्ही. टी. बागल सर (प्रा. कृषी शास्त्र विभाग दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची), मा. श्री. संभाजी कदम (पुरस्कार प्राप्ते प्रगतशील सेंद्रिय शेतकरी) यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले. तसेच सेंद्रिय शेती या विषयावर सर्व मार्गदर्शक यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना केले. यावेळी कृषी कन्या साक्षी गावडे, साक्षी दाभोळकर , प्राजक्ता एरंडोले, पायल खोमणे , सेजल खोत ,प्रिती देडे ,मनिषा भोंडवे तसेच मा. श्री. डॉ. एस.एम. शिंदे सर (प्राचार्य दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची) आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.