आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता:-लोणीच्या कु. प्रिया निर्मळ हिने क्लाउड व बिग डेटा परीक्षेत घवघवीत यश; द्वितीय क्रमांक पटकावत प्रवरानगरचे नाव उज्ज्वल.

पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

लोणीच्या कु. प्रिया निर्मळ हिने क्लाउड व बिग डेटा परीक्षेत घवघवीत यश; द्वितीय क्रमांक पटकावत प्रवरानगरचे नाव उज्ज्वल.

राहाता प्रतिनिधी : तालुक्यातील प्रवरानगर (लोणी) येथील विठ्ठलराव विखे पाटील तंत्रज्ञान व अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेली कु. प्रिया संपत (आबा) निर्मळ हिने क्लाउड कॉम्प्युटिंग आणि बिग डेटा परीक्षा २०२५ मध्ये उत्कृष्ट गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कॉलेजसह प्रवरानगर परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.
कु. प्रियाने मिळवलेल्या या यशामुळे आपल्या वडिलांचे, कॉलेजचे व शिक्षकांचे नाव उज्ज्वल केले आहे. पुढील काळातही ती उच्च शिक्षणात व तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करेल, अशा अपेक्षा तिच्या स्नेही, नातेवाईक व शिक्षणप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.
या यशामागे कॉलेज प्रशासन व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य श्री. राठी सर, विभाग प्रमुख श्री. लावरे सर, वर्गशिक्षक सोनाली म्हस्के मॅडम तसेच विषय शिक्षक श्री. निलेश लांडगे सर, तेजल म्हसे मॅडम, श्री. कवडे सर, श्री. पठारे सर, सौं. गौरी कडू मॅडम, श्री. सागर त्रिभुवन सर व सौं. पल्लवी लगड मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष शहाजी दिघे साहेब व तालुका उपाध्यक्ष शंकर सोनवणे यांनी कु. प्रियाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेचे कार्याध्यक्ष संपत निर्मळ (आबा), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे व सरचिटणीस उमेश पन्हाळे (राहाता तालुका कार्यकारीनी सदस्य श्रीपाद बोकंद ) यांच्या वतीनेही कु. प्रिया निर्मळ हिचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे.
कु. प्रियाच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, शिक्षणाच्या जोरावर यशस्वी भवितव्य घडवता येते, याचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button