सातारा:-Tet परीक्षेत मोठा गैरप्रकार ?काॅलेज केंद्रावर विद्यार्थ्यांनीना नियमबाह्यरीत्या प्रवेश नाकारल्याचा आरोप: चौकशीची मागणी.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

T e t परीक्षेत मोठा गैरप्रकार ?काॅलेज केंद्रावर विद्यार्थ्यांनीना नियमबाह्यरीत्या प्रवेश नाकारल्याचा आरोप: चौकशीची मागणी.

जिल्हा सातारा: दि. २३/११ /२०२५ रोजी TET परीक्षेदरम्यान सातारा येथील DJ कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना नियमबाह्यरीत्या परीक्षा नाकारल्याबाबत व अनियमितता झाल्याबद्दल चौकशी व कारवाई करण्याबाबत उत्तम भालेराव जबाबदार व जागृत नागरिक तथा संविधानाचे अभ्यास तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक यांनी मा. जिल्हाधिक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तक्रार देण्यात आली. दि.२३/११/२०२५ रोजी घेण्यात आलेल्या TET परीक्षेसाठी सातारा येथील DJ कॉलेज या केंद्रावर गंभीर अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात उपस्थित विद्यार्थी आणि स्थानिक सामाजिक प्रतिनिधींनी गंभीर आरोप नोंदवले आहेत.
परीक्षेच्या वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचूनही अनेक विद्यार्थिनींना परीक्षागृहात प्रवेश देण्यात आला नाही.व याउलट, काही विद्यार्थिनींना मात्र प्रवेश देण्यात आला, ज्यामुळे समान वागणूक आणि नियमनाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले असलेने ही माहिती तिथे उपस्थित विद्यार्थिनींनी स्वतः दिली असून, त्यांच्या मते हे सर्व प्रकार केंद्रातील संबंधित पर्यवेक्षकांच्या दुर्लक्षामुळे घडलेआहेत असे निदर्शनात आले आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी महाबळेश्वर तालुकाध्यक्ष आयु. भालेराव यांनी औपचारिकपणे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आहे.तसेच, या प्रकरणात जो कोणी जबाबदार (विशेषतः संबंधित दोशी किंवा अन्य कर्मचारी) आढळेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे वरील सर्व बाबी अत्यंत गंभीर असून परीक्षेच्या प्रामाणिकपणावर व विद्यार्थिनींच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना
विविध स्वरूपाचीमागण्या केल्या आहेत : DJ कॉलेज परीक्षा केंद्रातील संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी.त्या दिवसाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जतन करून तपासण्यात यावे, जेणेकरून सत्यता स्पष्ट होईल.
वेळेत येऊनही ज्यांना प्रवेश नाकारला गेला, त्या विद्यार्थिनींसाठी विशेष पुनर्परीक्षेची सोय करण्यात यावी.
या अनियमिततेस जबाबदार आढळणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचारी (ज्यात जोशी नावाच्या व्यक्तीचा समावेश असल्याची तक्रार आहे) यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सर्व परीक्षा केंद्रांवर कठोर नियमावली व नियंत्रण ठेवण्यात यावे.आपण या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा आहे.




