वाई मध्ये प्रथमच जनतेला सोबत घेऊन जाणारा नगराध्यक्ष संवाद कार्यक्रम संपन्न.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई मध्ये प्रथमच जनतेला सोबत घेऊन जाणारा नगराध्यक्ष संवाद कार्यक्रम संपन्न.

वाई | प्रतिनिधी —
वाई शहरात नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष संवाद’ कार्यक्रमा अंतर्गत जनसंवाद सत्रात नगरपरिषदेचा कारभार लोकाभिमुख व्हावा या हेतूने शहरातील विविध नागरी समस्या, तक्रार निवारण, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व प्रकाश व्यवस्था आदी विषयांवर नागरिकांनी नगराध्यक्ष संवाद कार्यक्रमात मते व्यक्त केली.
या संवाद सत्रात नागरिक व विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना मा. नगराध्यक्ष श्री. अनिल (भाऊसाहेब) सावंत यांनी प्रशासन जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असून कोणतीही तक्रार दुर्लक्षित केली जाणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला.
नगराध्यक्ष सावंत यांनी प्रशासन व नागरिकांमधील थेट संवाद हा सुशासनाचा पाया असल्याचे नमूद करत शंभर दिवसांनंतर पुन्हा एकदा जनता संवाद सत्र आयोजित करण्यात येणार असल्याची ठोस घोषणा केली. आज मांडलेल्या प्रत्येक प्रश्नावर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील संवाद सत्रात मांडला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असून, यासाठी वाईकरांचीही साथ तितकीच महत्त्वाची आहे,” असे आवाहन यावेळी नगराध्यक्षांनी केले.
या जनता संवाद कार्यक्रमा मुळे लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्यातील दरी कमी होऊन वाई शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
आगामी काळात वाई महागणपती मंदिरा जवळ लेजर लाईट शो लावला जाईल त्याच बरोबर सहा महिन्यात नाट्यगृहाचा नारळ फोडून प्रलंबित नाट्यगृहाची मुहूर्तमेढ रोवली जाईल तसेच छ शिवाजी महाराज पुतळ्याचे काम लवकरच पूर्ण होऊन वाईकरांची प्रतीक्षा संपेल अशी घोषणा केली
आज पर्यंत वाई सारख्या सांस्कृतिक शहरात वाई महोत्सव होत नव्हता तो येत्या २४जानेवारी ला होणार असून वाई ची आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक प्रगती करण्यासाठी आपण सदैव काम करू असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केले
नगराध्यक्ष संवाद कार्यक्रम पहिल्यांदा होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी वाई शहरातील प्रतिष्ठीत नागरिक डॉक्टर वकील विविध संघटनांचे प्रतिनिधी मंडळांचे अध्यक्ष महिला बचत गट व वाई शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्या साठी काशिनाथ शेलार नगरसेवक विजय ढेकणे प्रसाद बनकर बाळासाहेब जाधव भुसारी निलेश मोरे अविनाश रांजणे आदींनी सहभाग घेतला सूत्रसंचालन निलेश मोरे व आभार नगरसेवक विजय ढेकणे यांनी केले.




