वाई:-मांढरदेवी यात्रेमुळे वाई शहरात वाहतूक कोंडी.
पत्रकार अनिल वाडकर सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-मांढरदेवी यात्रेमुळे वाई शहरात वाहतूक कोंडी.

वाई : मांढरदेवी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने वाई शहरात वाहतुकीचा ताण वाढला. विशेषतः गणपती मंदिर परिसर, मोठा पूल ते किसनवीर चौक या मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे चित्र दिसून आले.
मांढरदेवीकडे जाणाऱ्या भाविकांच्या खासगी वाहने, एसटी बस, तसेच इतर पर्यटकांच्या वाहनांमुळे या मुख्य मार्गावर वाहतूक संथ झाली. काही काळ वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. याचा परिणाम शहरातील दैनंदिन वाहतुकीवरही झाला.
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना तसेच रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलीस व स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप करून वाहने पर्यायी मार्गाने वळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, मांढरदेवी यात्रेच्या काळात वाहतूक नियोजन अधिक प्रभावीपणे राबवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




