वाई नगरपालिकेचा फक्त नोटीसांचा फार्स! मुख्याधिकारी साहेब अनाधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार कधी?
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई नगरपालिकेचा फक्त नोटीसांचा फार्स! मुख्याधिकारी साहेब अनाधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार कधी?

सातारा वाई.
वाई शहरात मागील काही दिवसांपासून पासून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे यांनी उचल खाल्ली आहे व उचल खाताना दिसत आहेत. मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची आरोप मात्र वाईकर नागरिक करत आहेत. विनापरवाना अनाधिकृत बांधकामे याच्या तक्रारी नागरिकांकडून वाई नगरपालिकेत मागील काही काळात केल्या गेल्या आहेत व करत आहेत अनेक ठिकाणी जुनी नवी दुरूस्तीची कामे लोखंडी टी ऍंगल मध्ये दोन तीन मजली कामेही विनापरवाना अनाधिकृत झालेली आहेत.मंजूरीसाठी वेगळा प्लॅन प्रत्यक्षात बांधकाम मनमानी पद्धतीने असेच झाले आहे व असे चालू ही आहे. काही इमारती गटारांना घासून नगर रचना बांधकाम विभागाचे सर्व नियम राजरोसपणे पायाखाली तुडवून बांधण्यात आल्या आहेत पार्किंगची जागा दाखवून बेकायदेशीर दुकान गाळे काढून विकणे किंवा भाडे तत्वावर देणे अशा बाबी देखील आढळून येत आहेत मात्र मुख्याधिकारी संजीवनी दळवी मॅडम ह्या फक्त कागदी घोडे रंगवून नोटीसांची औपचारिकता करत आहेत नाम मात्र नोटीसा बजावून शांत का? पुढील कारवाई करणार कधी?करणार की नाही? यांची चर्चा मात्र दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे.
वाई नगरपालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी विनापरवाना अनाधिकृत बांधकामे झाली आहेत अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत अनेक व्यापारी संकुले तयार झाली आहेत मात्र यात अनेक ठिकाणी वाई नगरपालिकेच्या नगर रचना बांधकाम विभागाची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली केली जात आहे असेच दिसून येत आहे मात्र याकडे वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी मॅडम व वाई नगरपालिकेचा नगर रचना विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मुख्याधिकारी संजीवनी दळवी मॅडम नुसत्या नोटीसा बजावून शांत का? नोटीसांची मुदत संपुष्टात येवून ही नोटीसांप्रमाणे जी कायदेशीर कार्यवाही होणे गरजेचे आहे ते मात्र कुठंही दिसत नाही याचे काय कारण असावे जाणीवपूर्वक अशा विनापरवाना अनाधिकृत बांधकामाना वेळ मिळवून दिला जातोय का? वाई नगरपालिकेच्या या संथ बेजबाबदार काम पद्धतीमुळे यात नक्कीच कुठेतरी मोठ्या प्रमाणात आर्थिक घडामोडी तडजोडी घडत आहेत? अशा प्रकारच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.
यासाठी वाई नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी मॅडम वाई शहराचे होत असलेले विद्रुपीकरण थांबविण्यासाठी नुस्ता नोटीसांचा कारणामा दाखवण्याचे थांबवून कारवाई करणार का नुसताच नोटीसांचा खेळ खेळात राहणार या खेळाकडे वरिष्ठ प्रशासन विभाग, सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या प्रकरणात लक्ष घालणार का यावर नियमानुसार कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




