क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-हरीगाव येथे नाताळ उत्सव निमित्त भव्य शांती मिरवणूक.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

हरीगाव येथे नाताळ उत्सव निमित्त भव्य शांती मिरवणूक.

माळेवाडी प्रतिनिधी (RPS स्टार न्यूज ) संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तीस्थान हरीगाव येथे नाताळ उत्सव साजरा होत असताना हरीगावातून शांती मिरवणूक काढण्यात आल्या त्यावेळी हरीगाव प्रमुख धर्मगुरू रे फा.डॉमनिक रोझारिओ यांनी सांगितले की आज आपण ख्रिस्त जयंती सोहळा 25 डिसेंबरपासून साजरा करीत आहोत.या पूर्ण आठवड्यात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.आज 30 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सर्व वृद्ध भाविकांसाठी पवित्र मिस्सा अर्पण करण्यात आला.माणुसकीची भिंत या संस्थेने सर्व वृद्ध भाविकांना स्नेह भोजन दिले.व काही जणांना आधार काठी वाटप करण्यात आली.मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता पूर्ण धर्मग्रामात हरीगावातून शांती मिरवणूक [कॅण्डल मिरवणूक]काढण्यात आली.शांतीचा राजा प्रभू येशू ख्रिस्त आम्हा सर्वाना शांती प्रदान करण्यासाठी या जगात आला.तुम्हाला शांती असो .या अनमोल वचनाद्वारे त्याने आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात शांती प्रस्थापित व्हावी यासाठी पाचारण केले.जेंव्हा आमच्या अंतकरणात शांती असणार त्यावेळी ती शांती कुटुंबामध्ये समाजामध्ये आणि किंबहुना पूर्ण जगात प्रसारित व्हावी हीच प्रार्थना करण्यासाठी व हा हेतू सफल होण्यासाठी आजची ही शांती मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत सर्व भाविक मोठ्या संख्येने हातात मेणबत्ती घेऊन सहभागी झाले होते.सजवलेल्या वाहनात नाताळबाबा व येशू जन्माचा देखावा सादर करण्यात आला.दि 31 डिसेम्बर रोजी रात्री 9.30 वा.पवित्र तास व पवित्र मिस्सा होईल.1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.15 वा.देव मातेचा सण,4 जानेवारी रोजी प्रभूच्या प्रगटीकरणाचा सोहळा आदी कार्यक्रम होतील त्यात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू रे फा डॉमनिक रोझारिओ व सहकारी धर्मगुरू,तसेच धर्मभगिनी व चर्चचे पदाधिकारी यांनी केले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button