आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नागठाणे:-सामाजिक कार्यकर्ते श्री.नंदकुमार शिवाजी नलवडे यांच्या प्रयत्नाने नागठाणे जिल्हापरिषद गटातील सर्व आशा सेविका यांना “आशा चित्रपट” मोफत दाखवण्याचा लहान सा विशेष प्रयोग.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सामाजिक कार्यकर्ते श्री.नंदकुमार शिवाजी नलवडे यांच्या प्रयत्नाने नागठाणे जिल्हापरिषद गटातील सर्व आशा सेविका यांना “आशा चित्रपट” मोफत दाखवण्याचा लहान सा विशेष प्रयोग.

सातारा :- नागठाणे जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील महिला आशा सेविका ज्या की सर्वांच्या सुखदुःखात गावामध्ये सहभागी होऊन आरोग्य असेल किंवा शैक्षणिक असेल सर्व माहिती व सेवा शासनाच्या माध्यमातून करत असतात.त्या आपल्याच कोणाच्यातरी घरातील एक बहिण असते अशा या बहिणीने एक इच्छा व्यक्त केली की आम्हाला “आशा चित्रपट”आला आहे.तो आम्हा सर्व आशा महिलांना एकत्र पहावाचा आहे तरी तो आपण तुमच्या या सर्व बहिणींना दाखवावा असे अशा सेविकांनी माझ्या जवळ इच्छा व्यक्त केली आणि मी त्यांना हो म्हणलं कारण या सर्व अशा सेवेमध्ये आमच्याच गावातील आमच्याच घरातील कोणीतरी बहिण कोणतरी वहिनी आशाच आहेत तेव्हा आपल्या माणसासाठी आपण नेहमी सहकार्य करायचे हीच भावना आहे.




