कराड:-श्री शिवाजी विद्यालय कराड यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कराड:-श्री शिवाजी विद्यालय कराड यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

कराड:-श्री शिवाजी विद्यालय कराडचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ ,प्रमुख पाहुणे मा. श्री. दिपक शंकरराव डांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट कराडचे खजिनदार मा. श्री. संजय पुरुषोत्तम बदियाणी होते .संस्थेचे अध्यक्ष मा श्री जयंत काका पाटील, संस्थेचे संचालक मा. श्री राजेंद्र माने , यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे, श्री. डांगे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहून, आरोग्याकडे ,खेळाकडे लक्ष देऊन आई-वडिलांना आदर्श मानावयास सांगितले. स्व.यशवंतरावजी चव्हाण व आदरणीय पी. डी .पाटीलसाहेब यांच्या कार्याची माहिती सांगताना कराड गावाचे मोठेपण सांगितले व विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक केले.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
पारितोषिक वितरणानंतर विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाला .
समारंभास यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.टी.डी.जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी,पालक बहुसंख्येने उपस्थित होते.




