ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-उद्या वाईत विजयी नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार! राजकीय वर्तुळाचे लक्ष कार्यक्रमाकडे.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-उद्या वाईत विजयी नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार! राजकीय वर्तुळाचे लक्ष कार्यक्रमाकडे.

वाई नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये दणदणीत विजय मिळवलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ उद्या रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी वाई येथे आयोजित करण्यात आला आहे. वाई तालुका मराठी पत्रकार संघ, सर्वांगी प्रतिष्ठान व लो. टिळक स्मारक संस्था, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. श्री. विकास खरात (उपविभागीय अधिकारी, भोर ता. पुणे) यांच्या हस्ते पार पडणार असून, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या विजयाचा गौरव करताना वाई शहराच्या आगामी विकासदिशेला गती देणारा हा कार्यक्रम ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीत जनतेने दिलेल्या कौलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नगराध्यक्ष व नगरसेवक शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार या मंचावरून मांडला जाणार आहे.
सदर सत्कार समारंभ सायंकाळी ४.३० वाजता लो. टिळक स्मारक संस्था, वाई येथे होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाईच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय ठरणाऱ्या या कार्यक्रमामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button