पुणे:-कर्वेनगरमधील मुख्य जलवाहिनी फुटल्याने पश्चिम पुण्यातील पाणीपुरवठा खंडित.
पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुणे:-कर्वेनगरमधील मुख्य जलवाहिनी फुटल्याने पश्चिम पुण्यातील पाणीपुरवठा खंडित.

पुणे:-दि. २७ डिसेंबर २०२५ :
कर्वेनगर परिसरात पुणे महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागाची मुख्य पाईपलाईन फुटल्याने पुण्याच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. खडकवासला धरणातून येणाऱ्या पाण्याची सुमारे १००० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने खबरदारी म्हणून संबंधित भागातील पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे.
या पाईपलाईनमधून कोथरूड, बावधन, वारजे, पाऊड रोड, बाणेर-बालेवाडी, पाशान, एरंडवणे, डेक्कन, लॉ कॉलेज रोड व आसपासच्या परिसरांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद किंवा अत्यंत कमी दाबाने होत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागाने माहिती दिली की, पाईपलाईनमधील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाणी काढून टाकून दुरुस्ती व वेल्डिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर हळूहळू पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून अत्यावश्यक परिस्थितीत संबंधित प्रभाग कार्यालयामार्फत पाणी टँकरची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. तसेच, पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, अचानक झालेल्या या बिघाडामुळे नागरिकांचे हाल झाले असून पाणीपुरवठा कधी पूर्णपणे सुरळीत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




