कराड:-शिक्षण मंडळ कराडच्या स्वर्गीय शेठ राम विलास किसना लाल लाहोटी कन्या प्रशालेमध्ये वंदे मातरम सप्ताह, विद्यार्थी दिन उत्साहात साजरे.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शिक्षण मंडळ कराडच्या स्वर्गीय शेठ राम विलास किसना लाल लाहोटी कन्या प्रशालेमध्ये वंदे मातरम सप्ताह, विद्यार्थी दिन उत्साहात साजरे.

कराड:- शिक्षण मंडळ कराडच्या स्वर्गीय शेठ राम विलास किसना लाल लाहोटी कन्या प्रशालेमध्ये आज संपूर्ण वंदे मातरम गीताचे गायन करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 31 ऑक्टोबर रोजी 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पूर्ण देशभरात सात नोव्हेंबर पर्यंत वंदे मातरम सप्ताह साजरा करण्यात आला. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रताप सिंह हायस्कूल येथे आजच्याच दिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1900 यावर्षी प्रवेश घेतला होता तो दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या विद्यार्थी दिनाचे देखील प्रशालेमध्ये आज आयोजन करण्यात आले होते. प्रशालेमध्ये आज सामूहिक संपूर्ण वंदे मातरम गायन करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका हेमलता जंगम यांनी सुरुवातीला वंदे मातरम बाबत शासनाने सुचित केलेल्या निर्देशांचे स्पष्टीकरण दिले आणि वंदे मातरम या गीताची पार्श्वभूमी विशद केली.
प्रशालेची विद्यार्थिनी साईशा पारवे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंह विद्यालयात घेतलेल्या प्रवेशाबाबत ची माहिती विद्यार्थिनींना दिली.
प्रशालेचे शिक्षक अमृत गिजरे यांनी वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा संक्षिप्त स्वरूपातील इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील वंदे मातरम या गीताचे महत्त्व विशद केले. संगीत शिक्षिका अदिती फडके यांनी संपूर्ण वंदे मातरम या गीताचे गायन केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र भोसले यांनी केले.
याप्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका छाया कुंभार ,पर्यवेक्षिका सुनीता अवघडे, पर्यवेक्षक जगदीश कुंभार सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.




