महाबळेश्वर:-ऐतिहासिक महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ऐतिहासिक महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न.

तालुका महाबळेश्वर गाव गोगवे येथे दि. २३/१२/२०२४ रोजी भारतीय बौद्ध महासभा, ता. महाबळेश्वर यांच्या वतीने गोगवे, ता. महाबळेश्वर येथे महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय शिक्षीका आद.जोतीताई क्षीरसागर यांनी या शिबिरातून महिलांमध्ये धम्मजागर, आत्मसन्मान व संघटनशक्ती निर्माण करण्याचा ठाम संदेश देण्यात आला. कार्यक्रमासाठी केंद्रीय शिक्षिका आद. ज्योतिताई शीरसागर, महाबळेश्वर महिला तालुका अध्यक्षा नंदाताई यादव, जिल्हा संस्कार सचिव डॉ. दिलीप यादव, महाबळेश्वर तालुका महासचिव अनिल सपकाळ, कार्याध्यक्ष एकनाथ भालेराव, सिद्धार्थ यादव , बौद्धाच्यारी रमेश पवार शाखा नं. ४ अध्यक्ष दिलीप कांबळे, सचिव धोंडीबा पवार, बौद्धचारी रमेश पवार, प्रकाश सपकाळ, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव, भीम क्रांती युवक संघटनेचे महासचिव जगन कदम, सखाराम कदम, रवींद्र घाडगे, सुरेश कांबळे , पोलीस पाटील उत्तम कदम तसेच विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सशक्त व काटेकोर संचालन साईदास कदम यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा आंबेडकर नगर, गोगवे मंडळाच्या वतीने संविधान प्रत देऊन जाहीर सन्मान करण्यात आला, ही बाब अभिमानास्पद आहे.
💥 अशा धम्मप्रेरित उपक्रमांतूनच समाज परिवर्तन घडते आणि महिला शक्ती अधिक बळकट होते!




