सातारा:-जगद्गुरु संत तुकाराम महाराज तपोभूमी “भामचंद्र” मुक्ती संग्राम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

.जगद्गुरु संत तुकाराम महाराज तपोभूमी “भामचंद्र” मुक्ती संग्राम.

श्री क्षेत्र देहू जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामचंद्र, भंडारा डोंगराचे संरक्षण जनजागृती.
वरील विषयी कळविण्यात येते की श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु तुकाराम महाराज यांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामचंद्र, भंडारा डोंगराचे संरक्षण करण्याबाबत संत भूमी संरक्षण समितीचे तुकया भक्त मधुसूदन पाटील हे महाराष्ट्रात जनजागृती करत आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साधना भूमी असलेल्या भामचंद्र भंडारा डोंगर है सुरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे व शासनाने २०११ रोजी काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी मराठा महासंघाची धारणा आहे या प्रश्नावर तुकया भक्त मधुसूदन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पुणे येथे दिनांक २२ डिसेंबर २०२५ दुपारी १२:३० वाजता पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
सदर पत्रकार परिषदेसाठी आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी / वृत्तपत्राचे प्रतिनिधी पाठवून सहकार्य करावे असे प्रतिपादन करण्यात आले आहे.
दिलीप दादा जगताप राष्ट्रीय अध्यक्ष मराठा महासंघ
बब्रुवांनजी शेंडगे पाटील मराठा महासंघ द्वारा वारकरी आध्यात्मिक आघाडी प्रमुख




