पुणे:-आस्था योग निसर्गोपचार चिकित्सा, उपचार, शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन केंद्र आणि ग्रीन हिल निसर्गोपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे चौथी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ञ परिषद उत्साहात संपन्न.
पत्रकार देवेंद्र साठे पुणे शहर अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

आस्था योग निसर्गोपचार चिकित्सा, उपचार, शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन केंद्र आणि ग्रीन हिल निसर्गोपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे चौथी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ञ परिषद उत्साहात संपन्न.

आस्था योग निसर्गोपचार चिकित्सा, उपचार, शिक्षण, प्रशिक्षण व संशोधन केंद्र आणि ग्रीन हिल निसर्गोपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे चौथी राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ञ परिषद उत्साहात पार पडली.
या परिषेदमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल डॉ. देवेंद्र रामचंद्र साठे (पी. टी.) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. परिषदेच्या समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ. साठे यांना सन्मानपत्र, ट्रॉफी , पुस्तक, दैनंदिनी प्रदान करण्यात आले.
या वेळी डॉ. हेमंत खेडेकर (मर्मचिकित्सक), श्री कृष्ण दामोदर (दादा) जोशी, संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, स्वागताध्यक्ष तसेच संस्थापक डॉ. श्री विद्याधर चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
निसर्गोपचार क्षेत्रातील तज्ञ, चिकित्सक व अभ्यासकांनी या परिषदेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. निसर्गोपचाराची वाढती उपयुक्तता, संशोधनाची दिशा तसेच प्रशिक्षणाच्या संधी यावर या परिषदेत सखोल चर्चा झाली.
ही परिषद निसर्गोपचार क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरली असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे निसर्गोपचार अधिक व्यापक प्रमाणात समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन



