शिरगांव:-चांदखेड तालुक्यामध्ये रस्त्यावर अनोळखी मृतदेह.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी:-9767275783

चांदखेड तालुक्यामध्ये रस्त्यावर अनोळखी मृतदेह.
शिरगाव, दि. 6 (शफिक शेख) – चांदखेड तालुका, मावळ जिल्हा, पुणे येथे रस्त्याच्या कडेला एका अनोळखी इसमाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर इसमाच्या उजव्या हातावर समाधान व डाव्या हातावर जमुना व उजव्या हाताचे दोन नंबरचे बोटावर शितल असे गोंदलेले आहे. त्याच्या डाव्या डोळयाखाली अवजड वस्तूने मारल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर इसमाचे वय अंदाजे 22 ते 25 च्या आसपास असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंगात फुल बाहयाचा टी-शर्ट, फॉर्मल काळी पॅन्ट घातलेली असून गळयात काळा धागा आहे. सदर इसमास कोणी ओळखत असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
1. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खाडे – 9922250499, 7350017557
2. पोलीस कॉन्स्टेबल श्री. समाधान फडतरे – 8805544106, 8208967468