बामणोली:-निसर्गरम्य सावरी मधील मुंबई क्राईम ब्रँच पथकाच्या छाप्याने खळबळ.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

निसर्गरम्य सावरी मधील मुंबई क्राईम ब्रँच पथकाच्या छाप्याने खळबळ.

बामणोली दि: सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य जावळी तालुक्यात सावरी गावात आज शनिवारी दुपारी मुंबई क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांनी गुप्त पद्धतीने मोठा छापा टाकला . एका पत्र्याच्या शेडमध्ये एम.डी. ड्रग्स तयार होत असल्याची प्राथमिक माहिती पुण्यातील पुण्यातून पुढे आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याला फारसा कुणी दुजोरा दिलेला नाही.
कोयना जलाशयाच्या पलीकडील बामणोली परिसरातील सावरी गावची लोकसंख्या २९४ असून अवघी ५४ घरे आहेत. कष्टकरी व गरीब स्थानिक भूमिपुत्र रोजगारानिमित्त अनेक ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे सावरी गावचा उल्लेख झाल्यापासून अनेक जणांना नवल वाटत आहे. मुंबई क्राईम ब्रँच अधिकाऱ्यांनी टाकलेल्या या छाप्याच्या कारवाईत तीन कारागीरांसह एक स्थानिक व्यक्ती, असे एकूण चार जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याची कसून चौकशी सुरू झालेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे तांब गावापासून सावरी खूप दूर आहे. शिवसागर जलाशयामुळे त्याची विभागणी झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विधानसभा मतदारसंघात व खासदार उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा मतदारसंघात हे गाव आहे. परंतु, फारशी वर्दळ या ठिकाणी कोणी करीत नाहीत. ऐकीव माहिती नुसार सध्या समाज माध्यमावर नशापान करणाऱ्या ड्रग बनवण्याचा कारखाना पकडल्याचे बोलले जात आहे. त्याला अद्याप अधिकृत दुजारा कुणी दिलेल्या नाही.
सावरी हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातले एक गाव आहे, जे आपल्या भौगोलिक स्थानामुळे, निसर्गरम्य परिसरामुळे आणि ऐतिहासिक जावळी खोऱ्याचा भाग असल्यामुळे महत्त्वाचे आहे; हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असून, महाबळेश्वरच्या जवळ असल्यामुळे पर्यटनासाठीही ओळखले जाते आणि अलीकडेच एमडी ड्रग्स बनवण्याच्या गुन्ह्यामुळे चर्चेत आले . दरम्यान, याबाबत पोलीस यंत्रणेकडून अद्यापही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही.




