मायणी:-कलेढोण येथे परमपूज्य गीतामाई पुण्यतिथी उत्साहात संपन्न.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कलेढोण येथे परमपूज्य गीतामाई पुण्यतिथी उत्साहात संपन्न.

-मायणी प्रतिनिधी
गोंदवलेकर महाराजांच्या मातोश्री परमपूज्य गीतामाई यांची १३०वी पुण्यतिथी कलेढोण येथे गीतामाई मंदिरात दिनांक २१नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सप्ताहात दररोज सकाळी १०ते१२पारायण,दुपारी१२वाजता आरती,दुपारी१ते३महाप्रसाद, भजन,दुपारी४:३०ते६:३०नामजप,सायंकाळी७वाजता आरती,रात्री७:३०ते८:३०महाप्रसाद, रात्री ९ते१०भजन असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सप्ताहाच्या शेवटी २७नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता गुलालाचा म्हणजे फुले वाहण्याचा कार्यक्रम होऊन व गावातून पालखी प्रदक्षिणा घालून या सप्ताहाची सांगता झाली. या सोहळ्यात असंख्य भाविक सामील झाले होते. पुणे,मुंबई सारख्या दूर दूरच्या भागातून अनेक भक्त आले होते. हा सप्ताह अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गोंदवले,मायणी,साखरवाडी, विखळे, कलेढोण येथील भजनी मंडळानी यात सहभाग घेतला. सर्व कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने साजरे करण्यात आले. श्री प्रभू रामचंद्र व श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या कृपेने श्री महाराजांच्या आजोळी कलेढोण तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पूज्य गीतामाई मंदिर पूर्ण झाले असून गीतामाई,गणपती, राम लक्ष्मण – सीता,हनुमान व श्री गोंदवलेकर महाराज इत्यादी मूर्तींची प्राण प्रतिष्ठा झाली आहे. असंख्य भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. हा सप्ताह अत्यंत भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.




