राहाता:-कोल्हार/ तिसगावमध्ये उपसरपंचांच्या घरात चोरी; अंदाजे ३० ते ३५ हजारांची रोकड व सोन्याची अंगठी लंपास.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कोल्हार/ तिसगावमध्ये उपसरपंचांच्या घरात चोरी; अंदाजे ३० ते ३५ हजारांची रोकड व सोन्याची अंगठी लंपास.

राहाता तालुक्यातील तिसगाव येथे उपसरपंचांच्या घरात झालेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब तुकाराम रांधवणे हे शनिवारी सकाळी पंढरपूरला गेले होते, तर त्यांच्या पत्नी उपसरपंच उर्मिला भाऊसाहेब रांधवणे आपल्या मुलांसह माहेरी गेल्या होत्या. घर रिकामे असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य सेफ्टी दरवाजाचे कडी तोडून घरात प्रवेश केला .सोन्याची अंगठी तसेच अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये इतकी रोकड चोरून फरार झाले.
रविवारी दुपारी रांधवणे घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ लोणी पोलीस स्टेशनला माहिती दिली. कॉन्स्टेबल वाल्मिक पारधी यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत झालेल्या घटनेची पाहणी केली. त्यानंतर अहिल्यानगर येथील गुन्हे शोधक श्वान ‘सीमा’ आणि सहायक फौजदार रवींद्र वीरकर यांनी घटनास्थळी पाहणी करून वस्तूंचा वास घेतला. श्वान पथकाने चोरट्यांनी कडस्कर वस्तीच्या दिशेने पलायन केल्याचे निदर्शित केले.
तसेच अहिल्यानगरच्या फिंगरप्रिंट विभागाचे वडणगेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळी येऊन फिंगरप्रिंटचे नमुने संकलित केले.
लोणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल वाल्मीक पारधी हे करत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




