पुणे:-( बाणेर ) – घरफोडी करणारा सराईत आरोपी अटक, गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुणे दि.२३
घरफोडी करणारा सराईत आरोपी अटक, गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त.

बाणेर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात दिनांक ०८/०९/२०२५ रोजी सकाळी ११: ००ते ०१:०० च्या सुमारास लेन नंबर ११, वीरभद्रनगर बाणेर पुणे येथील फिर्यादी यांचे राहत्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या परवानगीशिवाय चोरीच्या उद्देशाने कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश करून फिर्यादीच्या घरातील लोखंडी कपाटातील लॉकर खोलून सोन्याचे ०४.०५ तोळे वजनाचे मंगळसूत्र व ५०,००० रोख रक्कम लुबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याने बाणेर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं.२०८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३),३०५ (अ ),३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर दाखल गुन्ह्यातील आरोपीचा बाणेर तपास पथकातील अधिकार व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदारामार्फत, विशेष कौशल्याचा वापर करून व एकूण ८८ सीसीटीव्ही फुटेज चेक करून काळेवाडी , पिंपरी, चिंचवड येथून आरोपी क्र.१ साहिल रवींद्र वाघमारे वय (२३) वर्षे धंदा-चहा हॉटेल रा. हरदेय कॉलनी विजय नगर, काळेवाडी सन १०८ पुणे. शाकीब छोटूशेख वय २६ वर्ष धंदा -रिक्षा चालक राहणार संजय गांधी नगर काळेवाडी ब्रिज जवळ गुप्ता किराणा स्टोअर जवळ पुणे यांना दि.१७/०९/२०२५ रोजी अटक केली होती. अटक आरोपीच्या ताब्यातून पुण्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल व तसेच चोरी केलेल्या पैशांमधून नगदी ३८,०००/- रु जप्त केले होते गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे चेतन उर्फ चेत्या काकासाहेब वाघमारे, वय २७ वर्षे धंदा-सध्या काही नाही.रा विजयनगर, अल्फान्सो शाळेसमोर, माया मार्केट ,जवळ साई गोटा, काळेवाडी , पुणे हा फरार होता नमूद आरोपीस दि.१४/११/२०२५ रोजी ताब्यात घेऊन त्याचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करून आरोपीकडे अधिक तपास करून गुन्ह्यामध्ये चोरी केलेले ४० ग्रॅम १४०मिली वजनाचे मंगळसूत्र जप्त करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे गुन्हा उघडकीस आणलेला आहे. अटक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध चोरी जबरी चोरी दरोड्याचा प्रयत्न व मारहाण शस्त्र अधिनियम नुसार विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर मा श्री मनोज पाटील,अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त, परि .४,पुणे शहर मा.श्री.विठ्ठल दबडे सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर यांचे सूचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री चंद्रशेखर सावंत, अलका सरग पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनी कैलास डाबेराव, सपोनि गणेश रायकर,पोउपनि दिपाली पाटील, पोहवा ६७०१ बाबा आहेर, पोहवा ६६७४ किसन शिंगे, पोहवा २३४३ गणेश गायकवाड, पोहवा ७३५६ निकाळजे, पोशि ८१४५ अतुल इंगळे, पोशि २४४१ गजानन अवतिरक, पोशि १०४०४ प्रदीप खरात, पोशि ८४१५ प्रीतम निकाळजे, पोशि ४५१ शरद राऊत, पोशि ३९०५ रोहित पाथरूट, पोशि २३९५ मराठे सर्व नेमणूक बाणेर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.




