नाशिक:-ज्योतिष धर्माचार्य म्हणुन नासिकच्या श्री अनिल चांदवडकर गुरुजी व श्री सचिन पाडेकर शास्री यांचा सन्मान.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ज्योतिष धर्माचार्य म्हणुन नासिकच्या श्री अनिल चांदवडकर गुरुजी व श्री सचिन पाडेकर शास्री यांचा सन्मान.

मायणी प्रतिनिधी—————
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचा दुसरा “ज्योतिष जीवनरत्न पुरस्कार प्रदान व ३७ वा ज्योतिष शास्त्री पदवीदान समारंभ” हा कार्यक्रम नुकताच नाशिक येथे संपन्न झाला.या कार्यक्रमास परमपुज्य शंकराचार्य, संकेश्वर पिठ आणि प्रसिद्ध विचारवंत माननीय श्री प्रकाशजी पाठक, प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
या प्रसंगी संकेश्वर पीठा तर्फे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री अनिल चांदवडकरगुरुजी व श्री सचिन पाडेकर यांना “ज्योतिष धर्माचार्य” ही उपाधी ने संकेश्वर पिठाचे मानपत्र प्रदान शंकराचार्य प..पु.श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती महास्वामी यांच्या हस्ते गौरवले गेले.
या प्रसंगी महास्वामी यांनी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या कार्याची प्रशंसा केली
तसेच महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या वतीने ६५ वर्षाच्या वरील व ज्यांनी ज्योतिष शास्र अध्यापनाचे कार्य २४ वर्ष व त्याहून अधिक केले आहे आश्या महाराष्ट्रातील २४ गुरुवर्यांचा ज्योतिष जीवन रत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह , सन्मान पत्र ,शाल, श्रीफळ , बुके देवून सन्मान करण्यात आला.
त्यात नागपुर च्या श्री ज्ञानेश्वर केशवराव कुलकर्णी व सौ. अनुराधा विनय कुऱ्हेकर.छ. संभाजीनगर च्या श्री.रवींद्र दिवस जोशी व डॉ.रमेश रामचंद्रराव परोपकारी.सोलापूरच्या पंचांग कर्ते श्री.अनंत (मोहन) धुंडिराज दाते, सातार च्या सौ.अनुराधा शिवदिन कुलकर्णी व सौ.पद्मावती जगदीश कासट, पुण्याच्या . श्री राधाकिसन नंदलाल वर्मा , श्री. प्रदिप भालचंद्र पंडित व सौ.मीनल पुरुषोत्तम कुलकर्णी ,ठाण्याच्या श्री.अशोक विनायक जोग व श्री नागराज श्रीनिवास पंडित, कल्याण च्या श्री.श्रीराम कृष्णा देवधर, श्री.अरुण वासुदेव जोशी व श्री.नरेंद्र गोविंद गोरे ,डोंबिवलीच्या सौ.सोनल प्रमोद नाईक व श्री.सुनील केशव घैसास, चेंबूर चे श्री.विश्वास मल्हार पुणतांबेकर व नासिक मधील श्री.अनिल आप्पाजी कुलकर्णी, श्री हरि लक्ष्मण येवला, श्री.उमाकांत मनोहर होसिंग, श्री.भरत मनोहर होसिंग, श्री.अजय वृजलालजोशी व श्री.किरण रामचंद्र देशपांडे. यांचा राज्य पातळीवरील मानाचा ज्योतिष जीवनरत्न पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. या सर्वाना सर्व विद्यार्थ्यांनी उभे राहून मानवंदना प्रदान केली.
ज्योतिष शास्री ३७ व्या पदविदान समारंभात महाराष्ट्रात ज्योतिष शास्री मध्ये प्रथम क्रमांक सौ.अर्चना संजय काळे द्वितीय क्रमांक सौ.पूनम कांचन सामंत तृतीय क्रमांक सौ.मिनल अनिकेत इनामदार तर नासिक केंद्रात प्रथम सौ.आरती प्रसन्न साठे व एकुण ८७ विद्यार्थ्यांना ज्योतिष शास्री पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.एकुण निकाल ४०% लागला.
मा.श्री.प्रकाशजी पाठक यांनी त्यांच्या भाषणात चिंतन करण्याची सवय सर्व अभ्यासकांना असावी असे प्रतिपादन केले. तसेच ज्योतिष अभ्यासकांनी ज्योतिषाच्या सर्व अंगांचा अभ्यास करायला पाहिजे असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्योतिष अभ्यास मंडळ,नविन नासिक यांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमात विशेष सहाय्य रविंद्र बडवे गुरुजी, रविंद्र बाग सर, प्रशांत चौधरी, गोविंद शास्त्री, श्रीरामचंद्र जोशी, तसेच विद्यार्थी, विजय निकम, प्रशांत वाघ, पंकज पाठक, मुकेश दंडगव्हाळ, सौ जयश्री चव्हाण, सौ विद्यामुंडावरे, सौ कविता कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.




