भुसावळ:-अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग तांत्रिक अडचणीमुळे ढकलण्यात आली पुढे.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग तांत्रिक अडचणीमुळे ढकलण्यात आली पुढे.

अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली.
भुसावळ – येथे येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी मुलींसाठी अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग जिल्हास्तर चे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आलेले आहे. या स्पर्धा पुढील महिन्यात घेण्यात येतील या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सायकलपटू मुली,महिलांनी अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. ही लीग दोन गटांमध्ये होणार असून, त्यामध्ये वुमेन ईलिट (खुला गट 2006 पर्यंत) आणि वुमेन्स जूनिअर (ज्युनिर गट मुली जन्म वर्ष 2007,2008) या वर्षी जन्म झालेला असावा.
महिलांना सायकलिंग खेळात प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवोदित सायकलपटूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी अस्मिता खेलो इंडिया उपक्रमांतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जळगांव जिल्ह्यात प्रथमच इतक्या नोठ्या प्रमाणात महिलासाठी सायकलिंग स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूसह क्रीडा प्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.या स्पर्धा राष्ट्रीय सायकलिंग महासंघ, खेलो इंडिया आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, जिल्हा सायकलिंग असोसिएश जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. तरी पुढील महिन्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त महीला खेळाडू नी रजिस्ट्रेशन करून सहभागी व्हावे. स्पर्धेची तारीख पुढे कळविण्यात येईल. असे आव्हान करण्यात आले आहे.




