सातारा:-पळसावडे टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात घोंगडी आंदोलनाने जिल्हाधिकारी परिसर गजबजला…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पळसावडे टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात घोंगडी आंदोलनाने जिल्हाधिकारी परिसर गजबजला…
सातारा दि: दुष्काळी माण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विंड मिल व जमीन खरेदी- विक्रीचा व्यवसाय निमित्त स्थानिक भूमिपुत्रांना अक्षरशः रोजगार उपलब्ध केला. हे भासून खरबडून निधी ओढला. परंतु, स्थानिकांना न्याय देण्यास यश आले नाही. त्याच्या निषेधार्थ कामगार हक्क व ग्राम विकास चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाटा पॉवर कंपनीच्या खोट्या आश्वासनाविरोधात कामगारांच्या न्याय हक्कासाठी घोंगडी बैठक आंदोलन व भंडारा भेट आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामुळे परिसर गजबजून गेलेला आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच टाटा पावर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीच्या विरोधात स्थानिक भूमिपुत्र कामगारावर होणाऱ्या अन्यायाला अनेकदा वाचा फोडण्यात आली.
प्रत्येक आंदोलनानंतर खोटी आश्वासने देऊन त्या आश्वासनाची अंमलबजावणी न करताच कामगारांना देशोधडीला लावण्याचा सातारा जिल्हा प्रशासनाने घाट घातला आहे. असा आरोप करून सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या समवेत कामगार विजया जानकर, स्वाती व्हरकाटे, रेश्मा चव्हाण, दिपाली चव्हाण, निर्मला चव्हाण, अजय जाधव, भागवत जानकर, समाधान चव्हाण ,विक्रम चव्हाण , अण्णासाहेब व्हरकाटे यांच्यासह अनेक कामगार घोंगडी बैठक आंदोलन व भंडारा भेट आंदोलनात बसलेले आहेत.
या आंदोलनासाठी सातारा जिल्ह्यातील फुले- शाहू- आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक डॉ. प्रसाद ओंबासे, डॉ. सोमनाथ साठे, वंचित बहुजन आघाडीचे अमोल गंगावणे, रमेश गायकवाड यांनी १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२५ व २१ ऑक्टोंबर २०२५ आणि त्यानंतर सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून घोंगडी बैठक आंदोलन सुरू केले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड मुंबई व सहाय्यक कामगार आयुक्त, आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु अद्यापही सातारा जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनाची धार वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




