प्रवरानगर:-‘वंदे मातरम्’ शतकोत्तरी सुवर्ण वर्षानिमित्त स्वदेशीचा संकल्प.
पत्रकार आदिनाथ कडू राहाता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

‘वंदे मातरम्’ शतकोत्तरी सुवर्ण वर्षानिमित्त स्वदेशीचा संकल्प.

प्रवारानगर
आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी ०९ वाजता डॉ. धनंजय गाडगीळ सभागृह, प्रवरानगर येथे
बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी १५० वर्षानिमित्त डॉ. धनंजय गाडगीळ सभागृह, प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आला.कार्यक्रमात जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील, प्रवरा कारखान्या चे चेअरमन डॉ सुजय दादा विखे पाटील ,प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे पाटील यांच्यासह हजारो विद्यार्थी नागरीक सहभागी झाले होते. याप्रसंगी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रसेवेचा आणि स्वदेशीचा संकल्प सर्वांनी एकत्रितपणे व्यक्त केला.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थी, नागरिक आणि पदाधिकाऱ्यांना स्वदेशीची शपथ देण्यात आली. यासोबतच देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्राधान्य देत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल उचलण्याचे आवाहन या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने केले.
‘वंदे मातरम्’चा घोष, देशभक्तीचा उत्साह आणि स्वाभिमानाची भावना याने संपूर्ण वातावरण भारावून गेले. हा सोहळा भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम ठरला.




