मळद:-(बारामती)-अमृत महोत्सवी वर्षा निमित्त संघनायक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर संपन्न.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

अमृत महोत्सवी वर्षा निमित्त संघनायक नेतृत्व प्रशिक्षण शिबिर संपन्न.

मायणी प्रतिनिधी
7 नोव्हेंबर हा भारत स्काऊट गाईड संस्थेचा वर्धापन दिन या निमित्ताने बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावी व सातवीच्या निवडक स्काऊट गाईडचे संघनायक प्रशिक्षण बारामती जवळील जिल्हा परिषद मळद केंद्र शाळा या शाळेत नियोजित वेळेप्रमाणे शिबिरास सुरुवात ध्वजारोहण करून झाले बेडन पॉवेल प्रतिमेचे पूजन शाळेचे माननीय मुख्याध्यापक काकासाहेब रोटे सर यांच्या हस्ते झाले तसेच शिबिर सहभागी युनिट अधिकारी हेही उपस्थित होते तसेच शिबिरामध्ये 57 स्काऊट आणि गाईड उपस्थित होते.शिबिरामध्ये स्काऊट चळवळी इतिहास, प्रार्थना, झेंडा, गीत, नियम ,वचन ,खेळ, कृतीव्युक्त, गाणी ,आरोळ्या घेण्यात आल्या, शिबिर प्रमुख म्हणून संस्था सचिव सूर्यकांत सोनवणे सर A.L.T.(s) व सहाय्यक शिबिर प्रमुख म्हणून लक्ष्मण थोरात सर A.L.T(s) यांनी कार्य केले नियोजित वेळेनुसार प्रमाणपत्राचे वाटप करून सहभागी स्काऊट गाईड ना देण्यात आले,मनोगतामध्ये स्काऊट गाईड चळवळीचे जीवनामध्ये किती महत्व आहे हे शाळेतील ज्ञानदेव काळे व मुख्याध्यापकांनी मनोगतामध्ये सांगितले शेवटी स्काऊट ध्वज खाली उतरून शिबिराची सांगता करण्यात आली.




