आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाबळेश्वरच्या सांडपाणी कारवाईने अनेक हॉटेल व्यवसायिकांचे हितसंबंध उघड.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महाबळेश्वरच्या सांडपाणी कारवाईने अनेक हॉटेल व्यवसायिकांचे हितसंबंध उघड.

महाबळेश्वर दि: थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरचे निसर्ग पर्यटन अनेकांना भुरळ घालते. या महाबळेश्वरच्या निसर्गावर घाला घालण्यासाठी अनेक नियम पायदळी तुडवले जातात. हा प्रकार नवीन नसला तरी अधून मधून होणाऱ्या कारवाईने चर्चा होते पुन्हा जैसे थे स्थिती असते. महाबळेश्वर मधील हॉटेल फाउंटनच्या सांडपाण्याबाबत तक्रारीनंतरच कारवाई केली. यामुळे अनेक हॉटेल व्यवसायिकांचे शासकीय कार्यालयाशी असलेले हितसंबंध उघड झाले आहेत. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती अशी की मौजे महाबळेश्वर फॉ.कं.नं. ८०, फॉ.स.नं. १५८ मधील
बॉबिंग्टन पॉईंट ते टायगर पाथ या राईडवर वनक्षेत्रात दुर्गंधीयुक्त सांडपाणी कोणतीही परवानगी नसताना सरास जोडले जात होते. इको सनसेटिव झोन असून सुद्धा याबाबत लक्ष कुणी दिले नाही किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाबळेश्वर नगरपालिका यांच्याशी असलेले काही हॉटेल व्यवसायिकांचे हितसंबंध हे निसर्गावरच घाला घालत असल्याचे सिद्ध झाले आहे. असा आरोप केला जात आहे.
अनेकदा गुन्हे घडत असतात. त्याची माहिती ही व्यक्तिगत फायद्यासाठी जतन करून ठेवली जाते. पण यशस्वी तडजोड होत नसल्या नंतर गुन्हे दाखल होतात. हीच मोठी चिंतेची बाब आहे. सदर परिसराची फिरून पाहणी केली असता,सदरचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी हे फाउंटन हॉटेल यांच्या एस. टी. पी. प्लांट मधून सोडले गेले होते. परंतु, पाईपलाईन फुटल्याने हे दुर्गंधीयुक्त सांडपाणी परिसरामध्ये नाकापर्यंत पोहोचले.त्यानंतरच
वनक्षेत्रात सदरील सांडपाणी वाहत असल्याचे दिसून आले. सदरील प्रकरणी मूळ मालक व कंपनी ऐवजी हॉटेल फाउंटन महाबळेश्वर व्यवस्थापक आबिद मोहम्मद डांगे, वय ५२ वर्षे यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत, वनक्षेत्रात दुर्गंधीयुक्त पाणी सोडून वन्यप्राण्यांचा वनातील अधिवास नष्ट केलेबाबत गुन्हा दाखल करण्यास वनविभागाला भाग पडले आहे.
प्रथम गुन्हा रिपोर्ट क्रमांक०५/२०२५ वनरक्षक महाबळेश्वर यांनी गुन्हा नोंद करून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्हा झाल्याचे कबूल केले आहे. परंतु असा प्रकार करण्यासाठी कुणाची संमती होती. हे मात्र आरोपीने तपासामध्ये सांगण्यास टाळाटाळ केली. असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
निसर्ग रम्य महाबळेश्वर परिसरातील वनक्षेत्रात सांडपाणी, मैलापाणी सोडण्यावर वनकायद्याने बंदी आहे. अशाप्रकारे कृत्य करून वनकायद्याचे उल्लंघन केल्यास एक वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास किंवा पाच हजार
रुपयापर्यंतचा द्रव्यदंड किंवा या दोन्ही होऊ शकतात. पण अशी कारवाई अद्याप कोणावर झाली आहे का? याबाबतचा तपशील मिळू शकलेला नाही.
वनविभागाला सर्व यंत्रणा पुरविणत आलेले आहे. वन कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणाने व्हावी. यासाठी वन विभागाकडे खूप मोठे अधिकार आहेत. या अधिकाराचा वापर योग्य झाला तर नागरिक तक्रार देण्यास पुढे येतील. हे जरी खरे असले तरी अनेक लेखी तक्रारीबाबत पुढे काय झाले? याची माहिती कधीच उपलब्ध होत नाही. तरीसुद्धा वनविभागाने केलेल्या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.
आता फाउंटन हॉटेलच्या व्यवस्थापनाने असे सांडपाणी महाबळेश्वर परिसरातील व्यवसायिक कोणी कोणी वन हद्दीत सोडते? याचा तपशील उपवनसंरक्षक, वन विभाग, सातारा व सहाय्यक वनसंरक्षक, महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल वनरक्षक वनमजूर यांना प्रत्येकी द्यावा. अशी मागणी महाबळेश्वरचे निसर्गप्रेमी नागरिक करत आहेत. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री महादेव मोहिते करत आहेत.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button