राहाता:-गोगलगाव हादरले : तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, गावावर शोककळा.
पत्रकार आदिनाथ कडू राहाता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

राहाता:-गोगलगाव हादरले : तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू, गावावर शोककळा.

राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे रविवारी सायंकाळी घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना… तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गोगलगाव शिवारातील चौधरी वस्तीजवळील तलावात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. शुभम पोपट चौधरी, वय नऊ वर्षे, आणि त्याची बहीण दिव्या, वय दहा वर्षे — हे दोघे घराजवळ खेळत असताना चुकून तलावात पडले. दोघांचेही पाण्यात बुडून निधन झाले.
दुर्घटनेची बातमी समजताच गावात एकच हाहाकार उडाला.
*आई जयश्री चौधरी आणि वडील पोपट चौधरी यांचा आक्रोश ऐकून प्रत्येकाचे डोळे पाणावले*
गावातील प्रत्येक घर दु:खाने स्तब्ध झाले आहे.
आज सोमवारी सकाळी शुभम आणि दिव्याचा अंत्यविधी शोकाकूल वातावरणात पार पडला. घरापासून स्मशानभूमीपर्यंत मोठा जनसमुदाय जमला होता.
या दुर्दैवी घटनेने केवळ गोगलगावच नव्हे, तर उंबरी बाळापूर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोटच्या गोळ्यांना गमावलेल्या चौधरी कुटुंबाचे दुःख शब्दांत सांगता येणार नाही.
या दोन चिमूकल्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.




