तिसगाव:-(कोल्हार)-ग्रामदैवत श्री मोठा महाराज यांचा सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव.
पत्रकार आदिनाथ कडू राहाता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

तिसगाव/ कोल्हार
ग्रामदैवत श्री मोठा महाराज यांचा सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव.

राहता तालुका येथील तिसगाव प्रवारा येथे श्री मोठे बाबा महाराज यात्रोत्सव २०२५. तसेच या वर्षी सालाबाद प्रमाणे समस्त प्रवरा पंचक्रोशीतून याही वर्षी खूप मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या बाबा महाराज यांचा यात्रा उत्सव यात्रा साजरा होणार आहे .
ग्रामदैवत श्री मोठे बाबा महाराज यांच्या यात्रोत्सवाचे औचित्य साधून, बुधवार, दि.०५ नोव्हेंबर २०२५ ते गुरुवार, दि.०६ नोव्हेंबर २०२५ हा पवित्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या यात्रेनिमित्त अभिषेकासाठी पाणी आणण्यासाठी अंकाई येथे मंगळवार, दि.०४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता प्रस्थान करावयाचे आहे.
तिसगाव, कोल्हार व भगवतीपूर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती करण्यात आली आहे.
यात्रेचे ठिकाण
तिसगाव प्रवरा तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर.
“जय श्री मोठे बाबा महाराज!”




