ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मेढा:-शिवसेनेच्या मेळाव्यात मेढयात सत्ताधारी मित्रपक्ष भाजप टार्गेट …..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

शिवसेनेच्या मेळाव्यात मेढयात सत्ताधारी मित्रपक्ष भाजप टार्गेट …..

मेढा दि: मेढा या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्याला शिवसेना पक्ष वाढ, राजकीय रणनीती ऐवजी सातारा – जावळी भाजप लोकप्रतिनिधी यांना टार्गेट करून शिवसेनेने महाविकास आघाडीच्या हाती प्रचाराचा मुद्दा दिल्याची चर्चा जावळी तालुक्यात रंगू लागलेली आहे.
याबाबत माहिती अशी की १९९५ साली सर्वसामान्य मतदार व शिवसैनिकांच्या अथक प्रयत्नाने पश्चिम महाराष्ट्र मध्ये जावळी तालुक्यात माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा ध्वज फडकला होता. आता सध्या शिवसेना एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी आणि एक संघ भाजप आणि घटक पक्ष अशा महायुतीचे सरकार आहे. परंतु, जावळी तालुक्यात सबकुछ मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे समीकरण जुळवण्यात आले आहे.
सत्तेच्या परिघाबाहेर जावळी तालुक्यातील शिवसैनिकांना फेकल्या गेल्यामुळे त्यांच्या मनातील अस्वस्थता व तळमळ याला फुंकर घालण्याचे काम पर्यटन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा तालुका जावळी या ठिकाणी करून दिले आहे. वास्तविक पाहता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांनी जावळी तालुक्यात किती प्रकल्प आणले? किती प्रश्न सोडवले? हा प्रश्न उरला असतानाच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता जावळी तालुक्यातील ठेकेदारयुक्त विकास कामे व टक्केवारी याबाबत आक्रमक रित्या शिवसेना स्टाईल शिवसैनिकांनीही उघडपणाने भाष्य केले.
शिवसेनेच्या मंचकावर उपस्थित असलेल्या अनेकांनी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये कमळ चिन्हावर मतदान करा. असे टाहो फोडून सांगितले होते. आज नेमकं कशात बिनसलं? हे आता शोधक पत्रकारिता करून लोकांसमोर मांडणे अशक्य झाले आहे.
जावळी तालुक्यातील लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि जिल्हा बँक, जावळी बँकेच्या नोकरी संदर्भात बाबत झालेला उल्लेख अनेकांना मनापासून पटले आहे. परंतु जे निर्भीडपणाने पत्रकारिता करतात . त्यांच्या बाजूने किती शिवसैनिक आहे? हे मात्र गुलदस्त्यात आहे.
मेढा येथील शिवसेना मेळाव्याला वास्तविक पाहता शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई,
मुख्य प्रवक्ता ज्योती वाघमारे,जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे,जिल्हा प्रमुख रणजित भोसले ,तालुका प्रमुख समीर गोळे,प्रशांत तरडे,शांताराम कदम,सातारा शहर प्रमुख निलेश मोरे,मेढा शहर प्रमुख संजय सुर्वे, विनायक पुसेगावकर रेशमा करंजकर ,नीलम जवळ, माधुरी सुर्वे प्रियांका दळवी,
सचिन करंजेकर, सुधीर करंदकर, प्रशांत जुनघरे, सचिन शेलार,गणेश निकम, भीम पवार, योगेश वाघे, कृष्णा वाघे, अमरदीप तरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना नेते व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी परखडपणाने मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत दोन दिवसांनी पाणी सोडले जाते. ही खूप मोठी शोकांतिका आहे. विकास कामांमध्ये लोकप्रतिनिधी कमी पडत असून सुद्धा शिवसैनिकांनी लढा उभारला आहे. याचे कौतुक केले आहे. शिवसैनिकांच्या पाठीशी ठाम राहण्याची भूमिका घेतलेली आहे.
मेढा नगरीच्या व्यवसायिक व रहिवाशांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. याबाबत सोमवारी दिनांक ३ नोव्हेंबर रोजी मेढा शहरातील करपट्टी संदर्भात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही दिली. महायुती जो निर्णय घेईल. तो आम्हाला मान्य असेल परंतु आम्ही स्वाभिमानाने घेतलेला निर्णय मान्य करू असे त्यांनी स्पष्ट केले.

सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात भरीव निधी दिला. आत्ताही उपमुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांच्याकडे जे-जे काम घेऊन गेलो, ते-ते काम त्यांनी मार्गी लावले असल्याचे सांगितले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक संघपणे या निवडणुका शिवसैनिकांनी लढण्यासाठी सज्ज व्हावे. असे आवाहन ओंबळे यांनी यावेळी केले.

दरम्यान, या कार्यक्रमात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मेढा शहरातील नेते सचिन जवळ यांनी आपल्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांसमवेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात शक्ती प्रदर्शन करीत प्रवेश केला. या शिवसेनेच्या मेळाव्याला शिवसैनिकांनी सत्तेत राहून टीका केल्यामुळे या शिवसेना मेळाव्याला अल्प प्रतिसाद मिळाला. याचे कारण अनेकांना या मेळाव्याला जाऊ नये. यासाठी मोर्चाबांधणी केली असल्याचे खात्रीलायक समजते. भरमसाठ बॅनर आणि कमी शिवसैनिक याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ रेडीमेड शिवसेना नेत्यांवर आल्याचे राजकीय निरीक्षकांनी मत नोंदवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडल्याने महायुती तच राजकीय विरोधक निर्माण झाले आहेत. याचा कितपत फायदा महाविकास आघाडीला होईल. हे येणारा काळच ठरवेल. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button