सांताक्रुझ पूर्व:-(मुंबई)-वाकोला विभागातील चक्रा हॉटेल येथील डी मार्ट जवळ बेकायदेशीर फूटपाथचे काम सुरू.
पत्रकार रॉनी अँथनी सांताक्रुझ शहर कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाकोला विभागातील चक्रा हॉटेल येथील डी मार्ट जवळ बेकायदेशीर फूटपाथचे काम सुरू.

दिनांक: ०२/११/२०२५ रोजी, वाकोला विभागातील चक्रा हॉटेल येथील डी मार्ट जवळ बेकायदेशीर फूटपाथचे काम सुरू.
प्रथम, कोणताही BMC चा अभियंता नसताना व सदर कंपनीचा सुद्धा अभियंता नसताना फूटपाथ काँक्रीट चे काम पावसात सुरू आहे.
दुसरे: (आज) रविवार आहे. कंत्राटदाराला माहित होते की, डी मार्ट मध्ये जाण्यासाठी ग्राहक व नागरीक मोठ्या संख्यने येणार, तरीसुद्धा डी मार्ट मध्ये जाण्यासाठी दुसरा पर्यायी कोणताही मार्ग उपलब्ध केला नव्हता. पर्यायी मार्ग नसल्याने अनेक ग्राहक व नागरिकांची गैरसोय होत होती. नाईलाजाने सामान न घेता ग्राहक व नागरिकांना पुन्हा माघारी जावे लागत होते.
जेव्हा राष्ट्रवादी पक्षाने बेकायदेशीर कामावर आक्षेप घेतला. पर्यायी उपाययोजना करण्यासाठी कामगारांना सांगितले. तेव्हा कामगारानी राष्ट्रवादीच्या आदेशानुसार उपाययोजना केली.
आता उपयोजनेचा मार्गाने ग्राहक व नागरिक डी मार्ट मध्ये जाऊ शकतात. उपाययोजना केल्याबद्दल ग्राहक व नागरिकांनी राष्ट्रवादी पक्षाचे आभार मानले.
पण, बेकायदेशीर काम केल्याबद्दल व काम करत असतांना नागरिकांना दिलेल्या त्रासाबद्दल अधिकारी आणि कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते मेहुल जाधव (मा. युवा जिल्हाअध्यक्ष: उत्तर मध्य मुंबई राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार) यांच्याकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.




