कणकवली-आचरा मार्गावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजवले सार्वजनिक बांधकाम विभागाचा केला निषेध : कलमठ हद्दीतील खड्डे न बुजवल्यास आंदोलन.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कणकवली-आचरा मार्गावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजवले
सार्वजनिक बांधकाम विभागाचा केला निषेध : कलमठ हद्दीतील खड्डे न बुजवल्यास आंदोलन.

॥ कणकवली : कणकवली- आचरा मार्गावरील पडलेले खड्डे बुजविण्याबाबत राजकीय पक्ष व विविध संघटनांसह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधले. याकडे असंवेदनशीलपणाने बांधकामच्या अधिकाऱ्यांनी
अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे संवेदशील नागरिकांनी या मार्गावर खड्डयांमुळे कुणाचाही बळी अथवा अपघात होऊ नये म्हणून या मार्गावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध केला.
”
धीरज मेस्त्री, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, माजी उपसरपंच वैद्यही गुडेकर, किरण हुन्नरे, विलास गुडेकर, निश्चिय हुन्नरे, यांच्यासह ग्रामस्थांनी खड्डे बुजविले. “बांधकामच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजविण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला. महामार्ग व ओरोस जि. प. परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे दोन महिलांचा बळी गेला होता. त्यामुळे कणकवली – आचरा मार्गावरील खड्डयांमुळे कुणाचा बळी अथवा अपघात होऊ नये म्हणून आम्ही श्रमदातून खड्डे बुजविले, असे ग्रामस्थांनी सांगितले. कलमठ हद्दीतील खड्डे बांधकाम ग्रामस्थांनी बुजवले. यावेळी संजय बेलवलकर, अभिजीत सावंत,शिवसेना उबाठा पक्षाच्या युवासेनेचे कलमठ शहरप्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य सावंत, आबा मेस्त्री, अण्णा कुशे, नितीन पेडणेकर, सुंदर कोरगावकर, सुयोग कांबळी, अनिकेत कांबळी, आतिश कोरगावकर, द्विजेश लोकरे,
संताप अनावर झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी सायंकाळी कलमठ हद्दीतील कणकवली – आचरा मार्गावरील पडलेले खड्डे स्वतः श्रमदान करून बुजवले. खड्डे भुजवण्या बाबतकोणतीही कार्यवाही केली नाही तर आंदोलन करण्यात येईल, आंदोलना वेळी परिस्थिती ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्यात बिघडली तर त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर राहील, असा इशाराही दिला आहे.




