पारनेर:-दि मदर ग्लोबल फाऊंडेशन येथे युनो मिंडा कंपनी्या वतीने दिवाळी साजरी…
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
दि मदर ग्लोबल फाऊंडेशन येथे युनो मिंडा कंपनी्या वतीने दिवाळी साजरी…

_अनाथ व वृद्धाश्रमातील रहिवाशांसोबत दिवे लावले, गोडधोड वाटून समाजातील माणुसकीचा दीप प्रज्वलित_
प्रतिनिधी :(पारनेर -राजकूमार इकडे)
यंदाच्या दिवाळीची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एका हृदयस्पर्शी उपक्रमाने झाली आहे. युनो मिंडा कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टीमतर्फे शिरूर येथील दि मदर ग्लोबल फाऊंडेशन अनाथाश्रम तसेच गोकुळ वृद्धाश्रम येथे भेट देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.टीम सदस्यांनी अनाथ मुलांबरोबर व ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवे लावले, गोडधोड वाटले, संवाद साधला आणि छोट्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आनंद व्यक्त केला. मुलांच्या चेहऱ्यांवरील निरागस हसू आणि ज्येष्ठांच्या डोळ्यांतील समाधान पाहून उपस्थितांना दिवाळीचा खरा अर्थ “देणं, काळजी घेणं आणि एकत्र साजरी करणं” अनुभवता आला.
या प्रसंगी युनो मिंडा CSR टीम तर्फे अनाथ व निराधार मुलांना, तसेच वृद्धाश्रमातील रहिवाशांना धान्य, किराणा साहित्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आनंद पोहोचवणे हीच खरी दिवाळी असल्याचा संदेश देण्यात आला.
युनो मिंडा कंपनीच्या सी.एस.आर. सदस्यांनी सांगितले की अनाथ आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत घालवलेले हे क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय आहेत. समाजाला दिलेलं प्रत्येक योगदान म्हणजेच दिवाळीचा खरा दीप आहे.
गेल्या ४८ वर्षांपासून पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई) यांनी सुरू केलेली दि मदर ग्लोबल फाऊंडेशन संस्था अनाथ, निराधार, विधवा व परित्यक्ता महिलांचे संगोपन करत आहे. संस्थेला शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नसून, तिचे कार्य केवळ दात्यांच्या सहकार्यावर चालते.संस्थेच्या अध्यक्षा विनय सिंधुताई सपकाळ यांनी पत्राद्वारे म्हटले आहे की,
“आपण दिलेली मदत आमच्यासाठी लाखमोलाची आहे. आमच्या कोणत्याही संस्थेला शासनाकडून अनुदान मिळत नाही. अशा वेळी युनो मिंडा कंपनीसारख्या दात्यांचे सहकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी ठरते. या पत्रामुळे युनो मिंडा कंपनीच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, समाजातील दुर्बल घटकांसाठी या दिवाळीत प्रेम, माणुसकी आणि प्रकाशाचा उत्सव खऱ्या अर्थाने उजळून निघाला आहे.
या वेळी युनो मिंडा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भूपेश मॉल, आनंदराव पालेकर, अनंत साठे, सचिन तांबे, हिराजी साठे, तानाजी पाटील, रोहित मोरे, वाल्मिक ढवळे, मनीष श्रीवास्तव, बाबू मराठे, अमित पांचाल, धनाजी शिंदे तसेच दि मदर ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने सचिन ढोरमले व अन्य युनो मिंडा कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
युनो मिंडा कंपनीच्या या सामाजिक संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, खऱ्या अर्थाने या दिवाळीत माणुसकी, संवेदना आणि प्रकाशाचा दीप उजळला आहे.




