खटाव तालुक्यात ऑक्टोबर हिट्स तडाखा.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
खटाव तालुक्यात ऑक्टोबर हिट्स तडाखा.
—–मायणी प्रतिनिधी—-मॉन्सूनचा पाऊस परतल्याने खटाव तालुक्यात आता ऑक्टोबर हिट्स तडाखा जाणू लागलाय तालुक्यात उन्हाचा चटका वाढला आहे नागरिक उकाड्याने हैराण झाल्या असून पुन्हा येशी आणि फँन ची आवश्यकता भासू लागली आहे सकाळच्या सत्रात उन्हाचा पारा वाढला आहे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला होता आता पाऊस गेल्यातच जमा आहे तालुक्यातील जनता वाढलेल्या उन्हाने त्रस्त झाली आहे चालू वर्षी या तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे आतापर्यंत झालेल्या पावसाने शेतीसह जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे पावसाच्या विश्रांतीनंतर आता शेतकऱ्यांची शेतातील कामे उरकण्याची लगबग सुरू आहे सध्या बाजरी काढणे, मु ग काढणे, चवळी काढणे, घेवडा काढणे, इत्यादी कामे सुरू आहे शेतकरी सकाळपासूनच शेतात राबता दिसत आहे दिवसभर प्रचंड ऊन, रात्री काही थंडी, तर पहाटेपासून धुके पडत आहे उन्हापासून बचाव व्हावा म्हणून गॉगल, टोपी , छत्री, यांचा वापर होऊ लागला आहे शेतकरी सकाळच्या सत्रातच शेतातील कामे उरकून घेत आहेत उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी उपाययोजना करत आहे मे महिन्यात अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत आला होता त्यानंतर जून जुलैमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तालुक्यातील पाणीपुरवठा करणारे येरळा तलाव ओ सांडून वाहत आहे सर्वच पाझर तलाव कमी आणि प्रमाणात भरले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.




