क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

राहाता:- निर्मळ पिंपरी असतगाव येथे शिव महापुराण कथेसाठी येणारे भाविकांचे मौल्यवान वस्तु, सोन्याचे दागिने – चैन, मोबाईल, पॉकेट – पर्स चोरी करणाऱ्या टोळया जेरबंद.

पत्रकार आदिनाथ कडू राहाता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत

शिव महापुराण कथेसाठी येणारे भाविकांचे मौल्यवान वस्तु, सोन्याचे दागिने – चैन, मोबाईल, पॉकेट – पर्स चोरी करणाऱ्या टोळया जेरबंद.

पंडीत श्री. प्रदिप मिश्रा यांची दिनांक १२/१०/२०२५ रोजी ते दि. १६/१०/२०२५ या कालावधीत शिव महापुराण कथा निर्मळ पिंप्री ता.राहाता येथे आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यक्रमासाठी देशभरातुन लाखो महिला व पुरुष भाविक सहभागी झालेले होते. या पुर्वीच्या कथेदरम्यान भाविकांचे मौल्यवान वस्तु चोरीस जातात अशी माहिती मिळाली असल्याने सदर ठिकाणी मा.श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक सो. अहिल्यानगर यांचे आदेशान्वये व श्री.सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री. अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग, श्री जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी, राहाता, लोणी या ठिकाणी पायी पेट्रोलिंग, हॉटेल लॉजेस चॅकींग, संशयित गुन्हेगारांवर पाळत तसेच नाकाबंदी करुन सदर कार्यक्रम ठिकाणी चोरी, दरोडा या सारखे तसेच दुखापती सारखे गुन्हयास प्रतिबंध होणेकरीता व शिव महापुराण कथा सुरळीत पार पाडण्याकरीता विविध पथके तयार करण्यात आली होती तसेच बंदोबस्त लावण्यात आला होता.


शिव महापुराण कथा अनुषंगाने दि.११/१०/२०२५ रोजी शिर्डी येथे पंडीत श्री. प्रदिप मिश्रा यांची मिरवणुक काढण्यात आलेली होती सदर मिरवणुकीत अनेक महिला व पुरुष भाविक सहभागी झालेले होते. सदर मिरवणुकीत सांयकाळी ०५.०० वा. चे सुमारास गर्दीचा फायदा घेवुन भाविक महिला व पुरुषांचे अंगावरील दागिने व मौल्यवान वस्तु यांची संगनमताने घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असलेल्या १. शिल्पा पप्पु कुमार वय २३ वर्ष रा.जुसी ता.जुसी जि. अलाहाबाद राज्य उत्तर प्रदेश २. पुनम राजेश कुमार वय ४० वर्ष रा.चितनपुर ता. सदर जि. वाराणसी राज्य उत्तर प्रदेश ३. अंजली संदिप कुमार वय २२ वर्ष रा.जुकीया ता. कैसरगंज जि. भराईच राज्य उत्तर प्रदेश ४. पुजा हनुमान कुमार वय २० वर्ष रा. मुगलसराय ता. मुगलसराय जि. चांडोली राज्य उत्तर प्रदेश ५. दुलारी घुरण कुमार वय ५० वर्ष रा. जुसी रेल्वे स्टेशन ता.जुसी जि.अलाहाबाद राज्य उत्तर प्रदेश ६. उन्नी सुरेशचंद्र पवार वय ४५ वर्ष रा. पुरणनगर ता. कोटपुरी जि. जयपुर राज्य राजस्थान अशा ०६ महिला आरोपी श्री. साईबाबा मंदिर परीसरात गेट नं.४ येथे पकडण्यात आल्या त्यांचेकडे कटर व ब्लेड अशी घातक शस्त्रासह मिळुन आल्याने त्यांना शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९२९/२०२५ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१०(५) अन्वये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास शिर्डी पो.स्टे.चे पोसई काळे करीत आहेत.


तसेच दि.१२/१०/२०२५ रोजी निर्मळ पिंप्री ते लोणी जाणारे रस्त्याचे कडेला न्यु इंग्लिश शाळेजवळ ता. राहाता सांयकाळी १९.३० वा.चे सुमारास शिव महापुराण कथेस असलेल्या गर्दीचा फायदा घेवुन भाविक महिला व पुरुषांचे अंगावरील दागिने, मौल्यवान वस्तु व पैसे यांची संगनमताने घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असलेल्या १. शिंदू विरु राखडे वय ४० वर्ष २. देवकाबाई मनिष हातांगळे वय ५५ वर्ष ३. छाया गोविंद हातांगळे वय ५५ वर्ष ४. भारती कालीन नाडे वय ४० वर्ष ५. पुजा पंकज लोंढे वय ४५ वर्ष ६. नंदिनी गुलशन राखडे वय ३५ वर्ष ७. उज्वला शिवा सकट वय ३० वर्ष ८. वर्षा निलेश खंडारे वय ४० वर्ष रा. अशोकनगर जि. वर्धा ९. दुर्गा संजय राखपसरे वय ३९ वर्ष १०. नंदा संजय सकट वय ४५ वर्ष रा. गंगानगर ता. नेवासा जि. अहिल्यानगर ११. सागर रमेश डोंगरे वय ३३ वर्ष रा. तार फैल वार्ड क्र.२८ वर्धा जि. वर्धा १२. नितीन जगदिश समुद्रे वय ३५ वर्ष रा. मस्जिद चौक, फुल फैल वर्धा जि. वर्धा १३. सचिन कुमार सुखदेव महोतो वय २१ रा.झारखंड अशा १० महिला व ०३ पुरुष यांना पकडण्यात आले त्यांचेकडे चाकु, कटर, ब्लेड व मारुती स्वीप्ट डिझायर गाडी नं. एम एच ३२ ए एस ५७९० असे वाहन व घातक शस्त्रे मिळून आल्याने त्यांना लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. ५५३/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१० (५) अन्वये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास लोणी पो.स्टे. चे पोसई चौधरी करीत आहेत.
तसेच दि.१४/१०/२०२५ रोजी सांयकाळी १७.३० वा.चे सुमारास श्री. साईबाबा मंदिर सोळा गुंठे परीसर शिडर्डी येथे गर्दीचा फायदा घेवून भाविक महिला व पुरुषांचे अंगावरील दागिने, मौल्यवान वस्तु व पैसे यांची संगनमताने घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असताना १. लाली लक्ष्मणसिंग वय २० वर्ष २. रुक्मीणी गोपाल सिंग वय २२ वर्ष ३. लच्चों लक्ष्मण सिंग ४. सितो प्रेम सिंग ५. कौशल्या हुकुम सिंग ६. भटेरा सिताराम सिंग सर्व रा. मरोली ता. होडल जि. फरीदाबाद राज्य हरीयाणा यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता वरील पैकी १. लाली लक्ष्मणसिंग वय २० वर्ष २. रुक्मीणी गोपाल सिंग वय २२ वर्ष हया कटर, ब्लेड अशा घातक शस्वासह मिळुन आल्या व इतर त्यांचे साथीदार गदींचा फायदा घेवुन पसार झाल्या त्यांचेविरुध्द शिर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९३४/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१०(५) अन्वये गुन्हा नोंद करुन अ.नं. १ व २ यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास शिडी पो.स्टे.चे सपोनि वाळके करीत आहेत.
दि.१५/१०/२०२५ रोजी सांयकाळी १७.१५ वा.चे सुमारास निर्मळ पिंप्री ता. राहाता येथील शिव महापुराण कथेचे मुख्य प्रवेशव्दाराजवळ शिव महापुराण कथेस असलेल्या गर्दीचा फायदा घेवून भाविक महिला व पुरुषांचे अंगावरील दागिने, मौल्यवान वस्तु व पैसे यांची संगनमताने घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याचे पूर्वतयारीत असलेल्या १. काजल मनिष मालवी वय २५ वर्ष रा. मनसा जि. निमज राज्या मध्यप्रदेश २. चंद्रवती लोधुकुमार हरजन वय ५७ वर्ष रा. रामबाग झोपडपटटी जि. इलहाबाद राज्य उत्तरप्रदेश ३. मायादेवी अमरकुमार हरजन वय ३० वर्ष रा. रामबाग झोपडपटटी जि. इलहाबाद राज्य उत्तरप्रदेश ४. पुष्पादेवी जसवाल कुमार हरजन वय २५ वर्ष रा. रा. रामबाग झोपडपटटी जि. इलहाबाद राज्य उत्तरप्रदेश ५. मालादेवी बिसालकुमार हरजन वय २५ वर्ष रा. रामबाग झोपडपटटी जि. इलहाबाद राज्य उत्तरप्रदेश अशा ०५ महिलांना
पकडण्यात आले त्यांचेकडे चाकु, कटर, ब्लेड असे घातक शस्त्रे मिळुन आल्याने त्यांना लोणी पोलीस स्टे गु.र.नं. ५५८/२०२५ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम ३१० (४), ३१० (५) अन्वये गुन्हा नोंद करुन करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास लोणी पो.स्टे. चे श्रेपोसई विखे करीत आहेत. 2
शिव महापुराण कधेदरम्यान दरोडा घालण्याचे पूर्वतयारीत असलेल्या अटक करण्यात आलेल्या
महिला व पुरुष यांची संख्या खालीलप्रमाणे
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
शिडी
९२९/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३१०(४),३१०(५)
दिनांक
११/१०/२०२५ ०६

अटक महिला
अटक पुरुष
लोणी
५५३/२०२५ भा.न्या संहिता २०२३ च कलम ३१०(४),३१०(५)
१२/१०/२०२५ १०
०३
3
शिडी
९३४/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३१०(४),३१०(५)
१४/१०/२०२५ ०२
लाणी
५५८/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३१०(४),३१०(५) एकुण
१५/१०/२०२५ ०५
२३
०३
वरील २३ महिला व ०३ पुरुष असे एकुण २६ आरोपींना अटक करुन सर्वांची नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा.श्री. सोमनाथ घार्गे सारे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग, श्री जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, रणजित गलांडे पोलीस निरीक्षक शिडी पो.स्टे., नितीन चव्हाण पोलीस निरीक्षक राहाता पो.स्टे., संदिप कोळी पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पो.स्टे., प्रविण सांळुके पोलीस निरीक्षक संगमनेर तालुका पो.स्टे., संजय सोनवणे पोलीस निरीक्षक आश्वी पो.स्टे., संजय ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पो.स्टे., महेश पाटील पोलीस निरीक्षक नेवासा पो.स्टे., ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक सुपा पो.स्टे., संतोष खेडकर
पोलीस निरीक्षक जिविशा अहिल्यानगर, मोरेश्वर पेंदाम पोलीस निरीक्षक सायबर पो.स्टे., कैलास वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे., अरुण धनवडे श्रीरामपूर तालुका पो.स्टे., सपोनि महेश येसेकर, सपोनि वाळके, पोसई सागर काळे, पोसई चौधरी, श्रेपोसई विखे व बंदोबस्तावरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महाराष्ट्र गृहरक्षक दलातील जवान यांनी केलेली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button