मुंबई:-सरस्वतीबाई दादासाहेब फाळके पुरस्कार२०२५ डॅा सुरेश जगदाळे सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन यांना प्रदान.
ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सरस्वतीबाई दादासाहेब फाळके पुरस्कार२०२५
डॅा सुरेश जगदाळे सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन यांना प्रदान.

मायणी प्रतिनिधी,—–
(बिदाल,ता.माण,जि.सातारा) येथील रहिवासी डॅा.सुरेश रूक्मिणी परशुराम जगदाळे सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन सातारा व नाशिक यांचा सहकुटुंब विशेष सत्कार सरस्वतीबाई दादासाहेब फाळके पुरस्कार २०२५ “स्मृती सन्मानचिन्ह” देऊन मुंबई येथील आयोजीत कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी मा.दुष्यंतकुमार गौतमजी यांचे हस्ते व व इतर मान्यवरांचे उपस्थित नुकताच करणेत आला.
सामान्य शेतकरी कुटुंबातून, बिदालच्या मातृभूमीतून सुसंकृतपणाचे आदर्श संस्कार व बिदालमध्येच पायाभूत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन शासकिय वैद्यकिय महाविद्यालय मिरज येथे एम्.बी.बी.एस्. व एम्. एस्.( जन.सर्जरी)चे उच्च शिक्षण घेतले.
सामान्य कुटुंबातील व बिदालच्या ग्रामीण भागातील शिकवण व संस्कारातून वाढलेल्या डॅा सुरेश यांनी सर्वसामान्य जनतेची आरोग्य सेवा करण्याचा निश्चय करून खाजगी व्यवसायाकडे न जाता महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागात १८८३ साली सेवा स्वीकारली.
नाशिक जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे माध्यमातून तेथील आदिवासी जनतेस डोंगरदर्यांत जावून आरोग्य सेवा दिल्या.
याची विशेष दखल घेऊन शासनाने त्यांना एम्.एस्.या उच्च शिक्षणासाठी शासकिय खर्चाने पाठविले.
अत्यंत कुशल सर्जन म्हणून त्यांनी कोल्हापूर व सातारा येथील शासकिय जिल्हा रुग्णालयाचे माध्यमातून १४ वर्षे शेकडो मोठमोठी ॲापरेशन्स करून सर्वसामान्य जनतेची उत्कृष्टपणे रूग्णसेवा केली.
त्यानंतर शासनाने त्यांना सिव्हील सर्जन म्हणून पदोन्नती सातारा येथे दिली.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली ( २००९ ते २०१५). या त्यांचे कार्यकाळात सिव्हील हॅास्पिटल सातारा व जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रूग्णालयांमध्ये गुणवत्तावर्धक अनेक सेवा सुविधा सर्वसामान्य जनतेसाऱ्ठी देवून मोठे समाजकार्य केले व सिव्हील हॅास्पिटलला *राज्यातील सर्वोत्कृष्ट रुग्णालयाचा दर्जा प्राप्त करून देऊन प्रथम क्रमांकाचे ५० लाखाचे पारितोषकही मिळवून दिले.
त्यानंतर त्यांना त्यांचे सेवाकाळाच्या उत्तरार्धात नाशिक जिल्ह्यातही सिव्हील सर्जन म्हणून ६वर्षे सेवा करणेची संधी मिळाली, तेथे त्यांनी उत्कृष्टपणे त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी मोठे सेवाभावी कार्य केले व तेथेही आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
•राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाचे माध्यमातून १८ वर्षाचे आतील ज्या मुलांना जन्मजात ह्रदयदोष होते अशा शेकडो बालकांच्या ह्रदयशस्रक्रिया मोफत करून दिल्या.
•हजारो वयाोवृध्दांच्या मोतीबिंदूच्या मोफत शस्रकिया करून त्यांना दृष्टीदान दिले.
•सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी ग्रामीण भागात जावून तज्ञ डॅाक्टराच्या मोफत सेवा दिल्या.
जिल्ह्यातील ३२ ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयांचे माध्यमांतून सर्वसामान्य जनतेसाठी गुणवत्तावर्घक आरोग्य सेवा दिल्या. अशाच प्रकारे त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी अनेक सेवाभावी कार्ये करून नाशिक सिव्हिल हॅास्पिटलला त्यांनी राज्यात सर्वोत्तम रुग्णालयाचा दर्जा मिळवून देऊन तीन वेळा प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी ५० लाखांचे तीन पुरस्कार त्यांनी या रूग्णालयास मिळवून दिले.
कोरोनाच्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता नाशिक जिल्ह्यातील लाखो लोकांना करोनापासून मुक्त करून त्या सर्वांना नवीन आयुष्याची दिशा दिली.
२०२१ मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त होऊन सध्या ते प्रवरा वैद्यकिय महाविद्यालय लोणी येथे रूग्णालय वैद्यकिय अधिक्षक या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सेवाभावी कार्य करीत आहेत.




