सावंतवाडी:-राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर मोठी कारवाई.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सावंतवाडी:-राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर मोठी कारवाई.

सावंतवाडी:-राज्य उत्पादन शुल्क विभागाने सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा – मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर मोठी कारवाई केली. अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरसह सुमारे १ कोटी ८ लाख ८० हजार रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उत्पादन शुल्क पथकाने मध्यरात्री १.०० वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. गोवा बनावटीची रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या ७२ हजार बाटल्या असलेले एकूण १५०० कागदी खोके असे अंदाजे ९३ लाख ६० हजार तर टाटा मोटर्स कंपनीचे तपकिरी रंगाचे केबीन असणारे बाराचाकी कंटेनर (क्र. GJ-10-Z-9984), किंमत अंदाजे १५ लाख व दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
रामनिवास (वय २५, रा. माणकी, बाडमेर, राजस्थान) व नूर आलम (वय २६, रा. पितईपूर, प्रतापगढ, उत्तर प्रदेश) यांच्यावर कारवाई करण्यात आली असून आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




