कुडाळ:-( सिंधुदुर्ग )-‘त्या’ मुलीच्या खून प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
‘त्या’ मुलीच्या खून प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती.

कुडाळ : तालुक्यातील घावनळे (वायंगणीवाडी) येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरण पुरावे गोळा करण्यात कुडाळ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या खून प्रकरणात अटकेत असलेल्या तिच्या मित्राने खुनानंतर लपवून ठेवलेली दोरी, दप्तर, मोबाईल, ओळखपत्र अशा तब्बल १६ वस्तू पोलिसांनी दोन दिवसांच्या शोध मोहिमेदरम्यान हस्तगत केल्या आहेत.
संशयित आरोपी कुणाल कृष्णा कुंभार (वय २२, रा. गोठोस, मांडशेतवाडी) याने एकतर्फी प्रेमातून हा निर्घृण खून केल्याची कबुली दिली
आहे. त्याने दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह वाडोस येथील निर्जन शेतमांगरात लपवून ठेवला होता. कुडाळ पोलिसांनी त्यास अटक करून सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस आरोपीला वाडोस येथील श्री देव बाटमकर मंदिर (बाटमाचा चाळा) परिसरात घेऊन जाऊन तपास करण्यात आला. पोलिस, पंच आणि आरोपी या सर्वांच्या उपस्थितीत आरोपीने डॉ. शरद पाटील यांच्या शेतमांगराजवळील झुडपाजवळ लपवलेली बॅग बाहेर काढली.सर्व वस्तूंचा पंचनामा करून त्या वस्तू पोलिसांनी सीलबंद केल्या.




