विटा:-(सांगली)-शिवप्रताप मल्टीस्टेट तर्फे दुहेरी लाभांश वाटप – सभासदांसाठी सुवर्णक्षण.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शिवप्रताप मल्टीस्टेट तर्फे दुहेरी लाभांश वाटप – सभासदांसाठी सुवर्णक्षण.

विटा (जि. सांगली) : येथील प्रथितयश शिवप्रताप मल्टी स्टेट नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटीने पुन्हा एकदा सभासदांप्रती आपली बांधिलकी सिद्ध करत सहकार क्षेत्रात नवे पर्व निर्माण केले आहे. संस्थेने यंदा सभासदांना दुहेरी लाभांश (Dividend) वाटपाचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
आज या दुहेरी लाभांश वाटपाचा शुभारंभ संस्थेच्या मुख्य कार्यालयात थाटात पार पडला. या वेळी संस्थेचे संचालक व युवा उद्योजक मा. सतिश साळुंखे आणि कार्यकारी संचालक ॲड मा. विठ्ठल साळुंखे यांच्या शुभहस्ते लाभांश वितरणास सुरुवात झाली. शिवप्रताप मल्टीस्टेट ही दुहेरी लाभांश देणारी पहिलीच संस्था ठरली असून, या उपक्रमामुळे सहकार क्षेत्रात संस्थेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. संस्थेच्या प्रवासात हा निर्णय केवळ आर्थिक नव्हे तर सभासदहिताचा मानला जात आहे.
संस्थेचे संस्थापक चेअरमन स्व. प्रतापशेठ दादा साळुंखे यांनी उच्चतम सेवा व सुरक्षा या संस्थेच्या ब्रीदवाक्यास अनुसरून आपल्या आयुष्यभरात सभासद हिताचा मार्ग स्वीकारला होता. “सभासदांच्या प्रगतीतच संस्थेची खरी प्रगती आहे” या त्यांच्या तत्वज्ञानाला आज नवे रूप प्राप्त झाले आहे. चेअरमन मा. शेखर साळुंखे यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक अॅड मा. विठ्ठल साळुंखे यांच्या अथक प्रयत्नांनी संस्था केवळ सेवा न पुरवता प्रत्यक्ष लाभ देणारी खरी सभासदांची हक्काची संस्था ठरली आहे.
या प्रसंगी सभासद श्री. सूर्यकांत मेटकरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “दुहेरी लाभांश हा केवळ आर्थिक मदत नसून आमच्या विश्वासाला दिलेला मान आहे. आज शिवप्रताप मल्टीस्टेटने पुन्हा एकदा दाखवून दिले की संस्था ही केवळ ठेवी-कर्जासाठी नाही तर सभासदांना त्यांच्या घामाच्या थेंबांचे खरे मूल्य देणारी विश्वासाची शिदोरी आहे. दुहेरी लाभांशामुळे संस्थेचे नाव सहकार क्षेत्रात सुवर्णअक्षरांनी लिहिले जाणार यात शंका नाही.”
कार्यक्रमाला लक्ष्मी बेकरीचे श्री.राजू किनाती,मुळीक ज्वेलर्सचे श्री.भरत मुळीक उपस्थित होते. या उपक्रमाचे सभासद, ग्राहक, महिला वर्ग, हितचिंतक यांनी स्वागत केले असून, शिवप्रताप मल्टीस्टेटची सभासदहिताची ओळख आणखी दृढ झाली आहे.




