वाई:-छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरवडा अंतर्गत मौजे केंजळ येथे शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सेवा पंधरवडा अंतर्गत मौजे केंजळ येथे शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
दिनांक :24/09/2025

या कार्यक्रमांमध्ये महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना पूर्व संमती पत्राचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर शेतकरी मासिक वाटप करण्यात आले त्यानंतर
खालील विषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
1.ऍग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी काढणे.
2.महाविस्तार AI मोबाईल अप्लिकेशन चा वापर
3.महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना अर्ज माहिती
4.मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड
5.प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
6.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
या कार्यक्रमासाठी मा. सोनाली मेटकरी (तहसीलदार तालुका वाई ), मा. श्री तुकाराम कोळेकर
(मंडळ अधिकारी सुरूर )
, मा. भाऊसाहेब शेलार
( उप कृषी अधिकारी भुईंज 2) सहाय्यक कृषी अधिकारी श्री फरांदे श्री शेळके श्री मोहिते तसेच केंजळ गावचे सरपंच ,ग्रा प सदस्य इतर शासकीय विभागाचे कर्मचारी अधिकारी, ग्रामस्थ व भगिनी उपस्थित होते.
मंडळ कृषी अधिकारी कार्यालय भुईंज




