वाई:-(व्याहळी)-मशाल फेरीने उमेद अभियानाची सुरुवात.
पत्रकार सुरेखा भोसले वाई तालुका महिला कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
मशाल फेरीने उमेद अभियानाची सुरुवात.

व्याहळी पुनर्वसन तालुका – वाई (ता. 25/07/2025 वाई ) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या PIP सर्वेक्षणा निमित्त व्याहळी गावात ‘उमेद अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रचिती महिला ग्राम संघांतर्गत महिला सबलीकरणासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमाची सुरुवात महिलांना PIP सर्वेक्षणाचे प्रशिक्षन देवून PIP ट्रेनर मनीषा भोसले यांनी केली . सर्वेक्षणाची सुरुवात मशाल फेरीने करण्यात आली.
या कार्यक्रमात अध्यक्ष दीक्षा मनोज मोहिते सचिव अक्षदा जयेश पिसाळ , कोषाध्यक्ष अश्विनी चंद्रशेखर देशमुख, लिपिका धनश्री वैभव थोरवे व सीआरपी राणी मानकुंबरे तसेच सर्व समूहातील महिला या सर्वेक्षणासाठी उपस्थित राहिल्या. तसेच प्रभाग समन्वयक श्री. सागर अभंग सर यांची प्रमुख उपस्थिती होती. CRP राणी नितीन मान कुंबरे यांच्या संयोजनातून व प्रचिती महिला ग्रामसंघ व्याहळी पुनर्वसन यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
अभियानातील या उपक्रमामुळे महिलांना शिक्षण, आरोग्य व उद्योजकतेच्या संधींची माहिती मिळून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यास मदत होणार आहे.विशेष म्हणजे, गावातील महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण अधिकच रंगतदार केले. उपस्थित ग्रामस्थांनी महिलांच्या भूमिकेचे कौतुक करून त्यांना उत्साहवर्धक शुभेच्छा दिल्या.
“””पीआयपी सर्वेक्षणातून गरीब, अती गरीब, मध्यम गरीब असे कुटुंबांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे तसेच उमेद अभियान प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचले आहे याची सुद्धा माहिती घेऊन राहिलेल्या वंचित घटकांना काही सोयीसुविधा मिळाल्या आहेत का नाही ते सुद्धा तपासली जाणार आहे. ज्या व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांना पुढील सहा महिन्यात ग्राम संघामार्फत त्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.




